बाबा सिद्दीकी हत्याकांडाचं नक्षल कनेक्शन आलं समोर, प्लान B काय होता? 

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील भागात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी ( Baba Siddiqui) यांच्या हत्येसाठी दोन प्लान केले होते. प्लान A फेल झाल्यानंतर प्लान B अंतर्गत बाबा सिद्दीकीची हत्या करण्याची तयारी होती. प्लान बीअंतर्गत सहा आणि शूटर्सची नेमणूक करण्यात आली होती. बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात तीन आरोपी गौरव अपुने, रुपेश मोहोळ आणि शुभम लोनकर प्लान बीअंतर्गत बंदूक चालवण्याच्या सरावासाठी झारखंडला गेले होते. क्राइम ब्रान्चच्या तपासानुसार या आरोपींना कोणीतरी AK-47 दिली होती.

बंदुक चालवण्याचा सराव...
पोलिसांनी दिलेल्या सूत्रानुसार, चौकशीदरम्यान गौरवने सांगितलं की, ते झारखंडच्या नक्षलगस्त भागात गेले होते. येथे त्याला AK-47 देण्यात आली होती. ज्या ठिकाणी या तिघांनी बंदुक शिकण्याचा सराव केला होता, तो भाग नक्षलग्रस्त होता. आता पोलीस नक्षलग्रस्त अँगलने तपास करतील. यांचा नक्षलवाद्यांशी काही संबंध आहे का, पोलीस याचा तपास करीत आहे. 

नक्की वाचा - परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची महाराष्ट्रात विशेष प्रचार मोहीम, नेमका काय आहे प्लान?

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील भागात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ तीन बंदुकधाऱ्यांनी गोळी मारून त्यांची हत्या केली होती.  गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर बाबा सिद्दीकींच्या हत्येत सामील होण्याचा आरोप आहे. 

Advertisement