Badlapur News : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं आहे. स्त्रीबीज विक्री प्रकरण चर्चेत असताना बदलापुरात शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान बदलापूरला हादरवून टाकणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील एका तरुणीने आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने देवतांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ दिसून येत आहे. या घटनेनंतर बदलापुरातून संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी भाजप महिला शहराध्यक्षांची मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे.
कार चालवित असताना केला व्हिडिओ...
बदलापुरातील एका तरुणीच्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. या तरूणीनं केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. तरुणीच्या वक्तव्यावरुन बदलापुरात संतापाची लाट उसळलीय. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी विरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलं आहे. या तरुणीने कार चालवताना हा व्हिडिओ बनवलाय. त्यानंतर तिने हा व्हिडिओ आपल्या स्टेटसवर टाकला. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतात हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करत या तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत बजरंग दल तसंच वारकरी संप्रदायाच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी या तरुणी विरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतलय. महत्त्वाचं म्हणजे या तरुणीची आई भाजप महिला शहराध्यक्ष आहे. या आक्षेपार्ह व्हिडिओचा शहरातल्या सर्वच संघटनांनी निषेध केलाय. रिक्षा संघटनांनी या तरुणीच्या निषेधार्थ रिक्षा बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे बदलापुरातील प्रवाशांना पायी प्रवास करूनच नियोजित स्थळ गाठावं लागतंय.