Badlapur Crime : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार, अहवालातून मोठी बातमी उघड

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात (Badlapur Crime News) मोठी अपडेट समोर आली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर केल्याचा आरोप केला जात होता. मात्र स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या चालवल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.  मात्र काही कृतींनुसार हा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) असल्याचा आरोप केला जात होता. यासाठी न्यायालयाने एक चौकशी समिती गठीत केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील चौकशी समितीचा अहवालात मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनीच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलं असून यामध्ये पाच पोलीस जबाबदार असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - Saif Ali Khan : हल्लेखोरापेक्षा पिळदार शरीरयष्टी, तरीही अभिनेता स्वत:चा बचाव का करू शकला नाही? अखेर कारण समोर

बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे. 

Advertisement