Nagpur Crime : टक्कल पडलं टेन्शन वाढलं, केसांसाठी तो बनला चोर; तरुणाने पोलिसांसमोर मांडली व्यथा!

तरुणाने स्वत: पोलिसांसमोर ही व्यथा मांडली. हा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

Theft for hair treatment : प्रत्येक व्यक्तीचं आपल्या केसांवर प्रचंड प्रेम असतं. वय वाढत असलं तरी केळ गळू नये असंच वाटत असतं. मात्र अनुवंशिकता किंवा काही आजारपणात केस गळू लागले की धाकधूक वाढते. अशावेळी विविध आधुनिक उपचाराची मदत घेतली जाते. यासाठी लाखो रुपये खर्च करण्याचीही सर्वांची तयारी असते. नागपुरातील एका पठ्ठ्याने टक्कल पडल्यानंतर चोरीचा मार्ग अवलंबला आहे. चोरानेच त्यामागील स्वत:ची व्यथा पोलिसांना सांगितली. हा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले. 

केस गळती होऊन टक्कल पडल्यावर कित्येक लोक त्यावर उपचार करवून घेतात आणि त्यानंतर डोक्यावर केस परत येण्याची वाट पाहतात. मात्र या प्रक्रियेत लागणारा लाखो रुपयांचा निधी गोळा करण्यासाठी नागपुरातील एक जण चक्क दुचाकी वाहनचोर बनल्याचं आता समोर आलं आहे. नागपूर पोलिसांनी एका अरबाज नावाच्या व्यक्तीला एक अॅक्टिव्हा दुचाकी स्कूटर विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला दुचाकी चोरीचं कारण विचारण्यात आलं. यानंतर मात्र चोराने पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोराला केसगळतीचा त्रास सहन करावा लागत होता. टक्कलवर पुन्हा केस यावेत यासाठी तो केसांसाठी ट्रीटमेंट करीत होता. मात्र ट्रीटमेंटसाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मात्र टक्कल पडल्याने डोक्यावर केसाची तीव्र इच्छा होती. शेवटी पैसे जमा करण्यासाठी चोराने स्कूटर आणि मोटरसायकली मिळून सहा दुचाकी वाहनं चोरली आहेत. त्याला या कामात सर्फराज नामक खुनाच्या गुन्ह्याचा आरोपी मदत करत असल्याचे आढळून आलं.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Sangli Crime : पाटलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् अचानक मृत्यू; चौकशीदरम्यान पत्नी-लेकाचा मोठा प्लान उघड

त्याचं असं घडले की लकडगंज पोलीस ठाण्यातील युनिट तीनचे अधिकारी आणि कर्मचारी हे माल धक्क्याजवळ पेट्रोलिंग करत असताना त्यांना खबऱ्यांकडून एक व्यक्ती अॅक्टिव्हा दुचाकी विकण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. ही दुचाकी चोरीची असू शकते असा संशय आल्याने पोलिसांनी ट्रॅप लावला आणि अरबाज नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा त्याने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, लकडगंज येथे एक, यशोधरा नगर भागात दोन आणि अन्य एक अशा सहा दुचाकी चोरल्याचे कबुल केले. या सहा दुचाकींची एकूण किंमत चार लाखापेक्षा अधिक आहे. 

Advertisement

या चोरींबाबत चोराला विचारण्यात आलं, यावरील त्याचं उत्तर ऐकून पोलीस चाट पडले. अरबाजने सांगितलं की, त्याच्या केसांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्या ट्रीटमेंट करिता लाखो रुपयांची गरज आहे. पैसे कुठून आणायचे यावर त्याने दुचाकी चोरीचा उपाय शोधला. या कामी त्याला सर्फराज नामक कुख्यात आरोपीची मदत मिळत असल्याचे देखील सांगितले. 

Topics mentioned in this article