AI इंजिनियर अतुल सुभाष सुसाइज प्रकरणात त्याची पत्नी निकीता सिंघानिया, तिची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरूतील इंजिनियर अतुल सुभाष याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता. यामध्ये त्याने पत्नी आणि तिच्या माहेरच्या सदस्यांवर गंभीर आरोप करीत आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं होतं. व्हिडिओसह अतुलने 23 पानांची सुसाइड नोटही पाठवली होती. त्यामुळे या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू होती.
नक्की वाचा - अतुल सुभाषवर जज हसत होते, काकांनी सांगितला तो किस्सा, मृत्यूनंतर पत्नीची आई-भाऊ फरार?
अतुल सुभाष याची पत्नी निकीताला गुरुग्रामहून अटक करण्यात आली तर तिची आई आणि भावाला प्रयागराजहून अटक करण्यात आली आहे. अतुलने काही दिवसांपूर्वीच निकिता आणि तिच्या माहेरच्यांवर छळ आणि जबरदस्तीने वसुलीचा आरोप केला होता. ज्यानंतर त्याने आत्महत्या केली होती. निकीता आणि तिच्या माहेरच्यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, यानंतर त्यांना न्यायालयीन अटकेत पाठवण्यात आलं आहे.
शुक्रवारी बंगळुरू पोलिसांनी निकीता सिंघानिया हिच्या जौनपूर घरावर नोटीस लावली होती. या नोटीशीत तीन दिवसात जबाब नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यादरम्यान इलाहाबाद उच्च न्यायालयात निकीता सिंघानिया, निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांच्याकडून अंतरिम जामीनासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नक्की वाचा - अंतरिम जामीन असूनही आरोपीला पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीच्या हाताला झालं फ्रॅक्चर
अतुलने लिहिली होती 23 पानांची सुसाइड नोट...
AI इंजिनियर अतुल सुभाषने पत्नी आणि सासरच्यांवर छळाचा आरोप केला होता. याशिवाय त्याने न्यायव्यवस्थेवरही बोट ठेवलं होतं. सुसाइडपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीसोबत होणारे वाद आणि त्यानंतर एक एक प्रकरण उघड केलं होतं.