भारताचे दोन शेजारी देश..सीमारेषा वेगळ्या… सरकारे वेगळी… पण हिंदूंविरोधातील द्वेषाचा पॅटर्न मात्र अगदी तसाच.एकीकडे बांग्लादेशात एका हिंदू तरुणाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. नंतर त्याला विष पाजून ठार मारण्यात आले. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका गरीब हिंदू मजुराच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. त्याने राहण्यासाठी एक कच्ची झोपडी उभी केली होती,हे यामागचं कारण होतं.
दोघांच्या मनात हिंदूंविषयी होता द्वेष
बांग्लादेश असो किंवा पाकिस्तान..हिंदूंविरोधात हिंसा आणि द्वेषाचं वातावरण निर्माण झालंय. एकेकाळी बांग्लादेश हा पाकिस्तानचाच भाग होता.पण वेगळे झाल्यानंतरही तेथील मुस्लीम लोक हिंदूंचा द्वेष करत असल्याचं बोललं जातं. दोन्ही देशांच्या सरकारनेही याकडे दुर्लक्षच केले आहे.
बांग्लादेश : हिंदू तरुणाला मारहाण, नंतर विष पाजलं
पहिली घटना बांग्लादेशातील सुनामगंज जिल्ह्यात घडली. येथे माणुसकीला काळिमा फासण्यात आली. 8 जानेवारीला
भंगदोहोर गावातील जॉय महापात्रो नावाच्या हिंदू तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर स्थानिक मुस्लीम व्यक्ती
अमीरुल इस्लामने त्याला जबरदस्तीने विष पाजलं. त्यानंतर त्याला सिलहटच्या एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नक्की वाचा >> Akola News: "मुंबई बॉम्बस्फोटात...", अकोल्याच्या सभेत असदुद्दीन ओवैसींनी अमित शाहांना टार्गेट केलं, म्हणाले..
डिसेंबरपासून आतापर्यंत 14 हिंदूंची हत्या
बांग्लादेशात हिंदूंना टार्गेट केल्याची ही एकच घटना नाही.बांग्लादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद (BHBCUC) यांच्या माहितीनुसार,गेल्या 18 दिवसांत 7 हिंदूंची हत्या करण्यात आली. डिसेंबरपासून आतापर्यंत हा आकडा 14 वर पोहोचला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत म्हटलं, “या हल्ल्यांना वैयक्तिक वैर म्हणून दाखवणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे गुन्हेगारांच्या कृत्यांना खतपाणी घालणं."
नक्की वाचा >> आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत:लाही संपवलं! सासूनेही केलं भयंकर, CA जावयाने असं काय केलं?
पाकिस्तान : हिंदू मजुराच्या छातीत गोळी झाडून हत्या
अशीच एक भयानक घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात घडली. बदिन जिल्ह्यात,जमीनदार सरफराज निजामानी यांनी किरकोळ वादातून कैलाश कोल्ही या हिंदू मजुराच्या छातीत गोळी झाडून हत्या केली. त्याने त्याच्या कुटुंबासाठी जमीनदाराच्या शेतात एक कच्ची झोपडी उभी केली होती, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली.या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानातील हिंदू समाजात संतापाची लाट उसळली. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते.