बांगलादेशातून भारतात अनधिकृत पणे घुसघोरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबतच्या तक्रारी अनेक वेळा केल्या जातात. ज्यावेळी पोलिस कारवाई करतात त्यावेळी हा घुसखोरांची माहिती समोर येते. तोपर्यंत त्यांचे वास्तव्य बिंदास भारतात असते. काही जण भारतीय ओळखपत्रही बनवता. याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. मात्र जळगावमध्ये एक भलतेच प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव मधील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत बरीचशी हॉटेल आहेत. या हॉटेलवर काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या हॉटेलवर छापा टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या हॉटेलवर छापा टाकला. त्यात त्यांनी हॉटेल चालकासह व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. त्याच बरोबर आणखी तीन जण ही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
त्या पोलिसांना महिलेसह एका तरुणीला सापडली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. ताब्यात घेण्यात आली तरुणी ही बांगलादेशची रहिवाशी होती. त्यामुळे तिला तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाबाबत विचारणा करण्यात आली. मात्र तिच्याकडे त्यापैकी काही नव्हते. ती कशी भारतात आली याची ही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस घेत आहेत.
ज्या बांगलादेशी तरुणीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आली आहे तिला शरीर विक्रीच्या व्यवसायात टाकले गेले होते. ती या व्यवसायात स्वत:च्या मर्जीने आली होती का याचा ही तपास आता पोलिस करत आहे. मात्र मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी शिरकाव केल्याचे आरोप या आधीही झाले आहे. त्यात आता अगदी जळगाव पर्यंत बांगलादेशी घुसखोरी करत असल्याचे या उदाहरणा वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यात हे बांगलादेशी भारतात कसे प्रवेश करतात याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.