Baramati Husband: 4 वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट! बारामतीच्या नवऱ्यानं बायकोला कारखाली चिरडले, कारण काय?

Baramati Husband Kills Wife : ज्या जोडीदारासोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या, त्याच नवऱ्यानं त्याच्या बायकोचा अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Baramati Husband Kills Wife : कारमध्ये सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की...
मुंबई:

Baramati Husband Kills Wife : ज्या जोडीदारासोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या, त्याच नवऱ्यानं त्याच्या बायकोचा अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संशयापोटी एका तरुणाने आपल्या पत्नीला केवळ बेदम मारहाणच केली नाही, तर भररस्त्यात धावत्या कारखाली चिरडून तिची निर्घृण हत्या केली. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील दृश्ये पाहून कोणाचेही काळीज धपापेल असा हा थरार आहे. हे दाम्पत्य महाराष्ट्रातील बारामतीचे असून, सुटीच्या निमित्ताने देवदर्शनाला गेले असताना हा सर्व प्रकार झाला.

Advertisement

काय आहे प्रकरण?

बारामतीचे हे दाम्पत्य कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूरला जात असताना बल्लुरगी गावाजवळ त्यांच्यात जोरदार वाद झाला. कारमध्ये सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी पतीने कार थांबवून पत्नीला बाहेर ओढले आणि तिथेच तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली असून, रस्त्यावरून जाणाऱ्या काही स्थानिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आरोपी पती आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. पीडित महिला मदतीसाठी ओरडत होती, तेव्हा काही स्थानिक लोक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी पतीला बाजूला केले. काही काळ परिस्थिती शांत झाल्यासारखी वाटली, मात्र नराधम पतीच्या डोक्यात हत्येचा कट आधीच शिजला होता. लोकांनी सोडवल्यानंतर काही वेळातच त्याने पुन्हा एकदा पत्नीवर हल्ला चढवला.

(नक्की वाचा : Ram Navami Rally: नालासोपाऱ्यात ठिणगी! रामनवमीच्या मिरवणुकीत पोलीस-भाविकांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं?)

कारखाली चिरडण्याचा अंगावर काटा आणणारा थरार

दुसऱ्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये असे दिसते की, मारहाणीमुळे ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोकळ्या जागेत कोसळली होती. त्याच वेळी आरोपी पतीने आपली मारुती सुझुकी अर्टिगा कार वेगाने मागे घेतली आणि जमिनीवर पडलेल्या पत्नीच्या अंगावर घालून तिला चिरडले. यात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय शैला हिचा जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही आरोपी पती तिथेच थांबून होता.

बारामतीचे दाम्पत्य आणि संशयाचे जाळे

कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अडूरू श्रीनिवासुलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला शैला आणि आरोपी पती अक्षय हे दोघेही बारामतीचे रहिवासी आहेत. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. अक्षयला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यातूनच त्याने हा हत्येचा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'विवाहबाह्य संबंधांच्या' संशयाने एका हसत्याखेळत्या संसाराचा असा भीषण शेवट झाल्याने बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : प्रोफेसरनं विद्यार्थिनीला क्लासमध्येच केलं प्रपोज,संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच धु धु धुतलं, VIDEO )

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी अक्षयला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला सोबत नेऊन तिची अशा प्रकारे हत्या करणे, हे पूर्व नियोजित कट असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

Topics mentioned in this article