Beed News: लग्न ठरलं, खर्च झाला, मंडप सजला! त्याच वेळी PSI नवऱ्याने दगा दिला, कारण समोर येताच...

हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बीडमधील एका गावात पीएसआय असलेल्या नवऱ्याने लग्नाच्या अगोदर अचानक नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे
  • पवन निंबाळकर नावाच्या पीएसआयवर लग्नाचा आमिष दाखवून लाखो रुपयांचा फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे
  • मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी दागिने आणि मोठा आर्थिक खर्च केला होता पण शेवटी फसवणूक झाली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

लग्न ठरलं होतं. सर्व तयारी ही पूर्ण झाली होती. फक्त डोक्यावर अक्षता पडण्याचे बाकी होते. त्याच वेळी नवऱ्या मुलाने लग्नाला नकार दिला. बरं तो नवरा दुसरा तिसरा कोणी नाही तर कायद्याचा रक्षक होता. पीएसआय असलेल्या या नवऱ्या मुलाने ऐनवेळी लग्नास नकार दिली. ही घटना बीडमधील गावात घडली. या प्रकरणी पीएसआय असलेल्या नवऱ्या मुला विरोधात मुलीकडच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाय न्यायाची मागणी ही केली आहे.  

या प्रकरणी कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या नवरदेव पीएसआयवरच फसवणुकीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन निंबाळकर नावाच्या पीएसआयने लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच अचानक नवरदेवाने लग्नास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काय करावे काय करू नये अशी स्थिती मुलीच्या कुटुंबीयांची झाली. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: माकडाच्या पिल्लाच्या डोक्यात अडकला तांब्या, त्यानंतर सुरू झाला एक थरार अन् शेवटी...

मुलीच्या आई-वडिलांनी आयुष्यभराची कमाई, दागिने, कपडे, साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर खर्च केली. मात्र शेवटी त्यांच्या पदरी आली ती फक्त फसवणूक आणि बदनामी. विशेष म्हणजे, या घटनेनंतर आई-वडिलांनी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्याच्या गावी गेले. त्यावेळी तुमची जर लग्न करायची इच्छा असेल तर 20 तोळे सोनं, दहा लाख रुपये हुंडा द्या, अशी मागणी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.  

नक्की वाचा - Buldhana News: बोथा जंगलातून जात असाल तर सावधान, रस्त्यावर गावकऱ्यांना जे दिसले त्याने धडकी भरेल

त्यांचा नाईलाज होता. घडलेल्या प्रकारानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले.  घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत. मात्र ठरलेलं लग्न हुंड्यासाठी शेवटच्या क्षणी तोडले गेले. त्यात त्या मुलीची काही चुकी नव्हती. अशा वेळी अचानक लग्न तुटल्यानं त्या मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आता या प्रकरणी आपल्याला न्याय मिळाला अशी मागणी लावून धरली आहे.