संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोप वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली आहोत. त्यासाठी 10 ते 50 कोटी रुपये दिले जाणार होते. असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ बनवला आहे. त्यात त्यांनी काही खळबळजनक गोष्टी सांगितल्या आहेत. फेक एन्काऊंटर बाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, गृह सचिव यांचे ही नाव घेतले आहे. कासले यांच्या दाव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती, असा दावा कासले यांनी केलाय. बोगस एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजीत कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या बीड मधील सोशल माध्यमांवर रणजीत कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. रंजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत.
आता वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडालीय. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा फेक होता. त्यासाठी एसआयटी नेमली जाणार आहे. पण त्यातून काही होणार नाही. एसआयटी नेमायची असल्यास ती केंद्राची नेमा असंही कासले याने या व्हिडीओत म्हटलं आहे. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची ऑफरही आपल्याला देण्यात आली होती. त्यावेळी आपण सायबर विभागात होतो. असे बोगस एन्काऊंटर करण्या आधी पूर्ण तयारी केली जाते. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री गृहसचिव यांची गुप्त बैठक होते. त्यानंतर पाच सहा जणांची टीम निवडली जाते असं ही त्याने या व्हिडीओत सांगितलं आहे.
या टीममध्ये विश्वासातील माणसे घेतली जातात. त्यांना मोठ्या रक्कमेचे अमिष दाखवले जाते. पुर्ण पोलिस सेवेत जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढे पैसे त्यांना दिले जातात. शिवाय चौकशीत ही निर्दोष ठरवण्याचे आश्वासन दिले जाते. खात्यात परत घेण्याचे आश्वासन ही दिले जाते. असं ही ते या व्हिडीओत सांगतात. या व्हिडीओत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. ते बीडला घाबरतात. त्यांनी गृहमंत्री म्हणून काही काम केले नाही असा आरोप ही त्यांनी यावेळी केली आहे.