Beed News: 'अयोध्येतील राम मंदिर उडवायचंय..' बीडच्या तरुणाला पाकिस्तानमधून मेसेज, 'इतक्या' लाखांचं आमिष दिलं

अयोध्येचे राममंदिर उडवण्याबाबत थेट बीडच्या तरुणाला फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

बीड: देशभरातील विविध मंदिरे, रुग्णालये तसेच विमानतळांवर बॉम्ब हल्ला करण्याच्या धमकीचे मेसेज, कॉल वारंवार येत आहेत. अशा धमकीच्या प्रकारांनी पोलीस प्रशासनाची नेहमीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळते. अशातच आता अयोध्येचे राममंदिर उडवण्याबाबत थेट बीडच्या तरुणाला फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Fake Currency Racket: संभाजीनगरमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त! एका सिगरेटमुळे काळा धंदा उघडकीस

अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटले आहे. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले.

संबंधित तरुण सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेजद्वारे सांगितले.

Pune Crime: पुण्यात वर्दीही असुरक्षित? गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण; गाडी अडवल्याचा राग अन्...