जाहिरात

Crime News: 'सॉरी' म्हणाले तरीही पाठलाग केला, रिक्षा चालकाच्या बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

लहू मामलेदार यांनी 2012  मध्ये च्या गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यातील फोंडा मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोंमतक पक्षाच्या (एमजीपी) तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.  

Crime News: 'सॉरी' म्हणाले तरीही पाठलाग केला, रिक्षा चालकाच्या बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

बेळगाव: क्षुल्लक कारणावरुन रिक्षा चालकाने माजी आमदाराला बेदम मारहाण केली त्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढताना पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडली आहे. लहू मामलेदार (वय 69) असे त्यांचे नाव असून ते गोव्यातील माजी आमदार आहेत. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे आमदार लहू मामलेदार  हे कामानिमित्त बेळगावला आले होते. यावेळी  दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान राहुल नावाच्या व्यक्तीशी आणि एका रिक्षा चालकाशी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. आमदारांची गाडी रिक्षाला धडकल्याने हा सगळा वाद झाला.

या वादात रिक्षा चालकाने त्यांच्या कानाखालीही लगावली. दोघांमध्ये मारहाण सुरु असल्याचे दिसताच लॉजच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर लोकांनी त्यांचा वाद मिटवला. मात्र याचवेळी लॉजच्या पायऱ्या चढून जाताना त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात पडले. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालकाला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लहू मामलेदार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

दरम्यान, लहू मामलेदार यांनी 2012  मध्ये च्या गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यातील फोंडा मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोंमतक पक्षाच्या (एमजीपी) तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसकडून पराभव झाला.  त्यानंतर ते महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: