Karnatak News : कर्नाटकातील बंगळुरुत रविवारी एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. प्रेस्टिज जिंदाल सिटी अपार्टमेंटमध्ये भारतीय वायुसैन्याच्या एका तरुण इंजिनियरने 24 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. मृताची ओळख 25 वर्षीय लोकश पवन कृष्णा असल्याचं समोर आलं आहे. लोकेश गेल्या वर्षांपासून भारतीय वायुसैन्यात इंजिनियर पदावर कार्यरत होता आणि हलसुरू क्वार्टरमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश शनिवारी सायंकाळी आपली बहीण लक्ष्मीच्या घरी आला होता. यादरम्यान कोणत्या तरी गोष्टीवरुन त्याचा मूड खराब झाला आणि रागाच्या भरात त्याने 24 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांकडून तपास सुरू...
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेत नेलमंगल सार्वजनिक रुग्णालयात पाठवला. येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक तपासात आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.
नक्की वाचा - Akola News : आई शेजारी झोपलेली, अन् तो नराधम अत्याचार करीत राहिला; अकोला पुन्हा हादरलं!
कुटुंबावर शोककळा
लोकेशने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबासह भारतीय वायुसैन्याच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. एक तरुण आणि प्रतिभाशाली इंजिनियरने अचानक उचललेल्या या पावलामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेल्पलाइन
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ९९९९६६६५५५ किंवा help@vandrevalafoundation.com
TISS आयकॉल ०२२-२५५२११११ (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)
(जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला माहिती हवी असेल तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी संपर्क साधा)
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |