Pune News : भिगवणमधील वातावरण चिघळलं; अपहरण झालेल्या मुलीचा Video समोर आला अन् प्रकरणात मोठा ट्विस्ट

bhigwan kidnapping case : पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये २१ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये २१ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. १७ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झालं होतं. यामध्ये बाजारपेठेत आई आणि भावासोबत आलेल्या या तरुणीचं दोन मुस्लीम तरुणांची अपहरण केल्याची बातमी समोर आली होती.  या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे, तसेच भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला आहे. 

अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ आला समोर...

अपहरण झालेल्या मुलीसोबत आरोपी बसलेला दिसत आहे. यामध्ये ती म्हणते, वर्षभरापासून आमचं प्रेमप्रकरण सुरू आहे. माझं अपहरण झालेलं नाही. किंवा माझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. मी माझ्या मर्जीने त्यांच्यासोबत गेल्याचं मुलीने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ती पुढे म्हणाली, माझ्यावर मिरचीची पूडही टाकण्यात आली नाही. त्यामुळे नेत्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेऊ नये. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.  

नक्की वाचा - Pune News : डोळ्यात लाल तिखट फेकलं, भरबाजारात आई-भावासमोर मुलीला पळवलं; स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
 

आरोपी आणि पीडितेची ओळख.. 

अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजाशेजारी आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणे सुरु होते. ते वेगवेगळ्या धर्माचे असले तरी त्यांची बालपणापासूनची ओळख आहे. त्यांचे कॉल तसेच टेक्स्ट मेसेज हाती लागले आहेत. पोलिसांनी दोघांचेही फक्त 1 महिन्याचे डिटेल मागवले होते. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.  

याप्रकरणात कोणीही चुकीच्या गोष्टी करु नये.  कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत. या सर्व प्रकरणाचे सत्य समोर येईल, पोलीस त्याचा तपास करणार आहेत. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Advertisement