Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण

Bhigwan kidnapping case : पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधील बहुचर्चित प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठे वळण घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
भिगवण, पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Bhigwan kidnapping case : पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमधील बहुचर्चित प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठे वळण घेतले आहे. ज्या तरुणीने काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता, त्याच तरुणीने आता आपला जबाब बदलला आहे. इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आता आपली आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, न्यायालयाने तिचा ताबा कुटुंबाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. या बदललेल्या भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुलीच्या जबाबातील बदल 

इंदापूरच्या भिगवण परिसरातील या तरुणीला काही दिवसांपूर्वी सुधारगृहात पाठवण्यात आले होते. पाच दिवस सुधारगृहात राहिल्यानंतर आज इंदापूर न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने संबंधित तरुणीला काही प्रश्न विचारले आणि तिला कोणासोबत जायचे आहे, अशी विचारणा केली. 

त्यावर तरुणीने अत्यंत स्पष्टपणे सांगितले की, मला आता माझ्या आई आणि मामासोबत राहायचे आहे. तरुणीची ही बदललेली भूमिका पाहून अनेकांना धक्का बसला आहे, कारण यापूर्वी तिची भूमिका पूर्णपणे वेगळी होती.

( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )

बारामती न्यायालयात काय सांगितले होते

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने वेगळीच भूमिका मांडली होती. त्यावेळी तिने आपल्या कुटुंबासोबत जाण्यास नकार दिला होता आणि आपण झहीर शेख सोबतच जाणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. आई बारामती पोलीस स्टेशनला तिला नेण्यासाठी आली होती, मात्र मुलीने नकार दिल्याने तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत तिने आपला निर्णय बदलल्याने या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.

Advertisement

प्रतिज्ञापत्रातील जुने दावे आणि कुटुंबाचे आरोप

यापूर्वी तरुणीने एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते, ज्यामध्ये तिने जहीर शेख सोबत मागील 1 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले होते. आपल्या घरच्यांचा या विवाहाला विरोध होता आणि त्यांनी इच्छेविरुद्ध लग्न ठरवल्यामुळे आपण स्वतःहून जहीरला फोन करून बोलावून घेतले, असा दावा तिने केला होता. 

( नक्की वाचा : Ahilyanagar: मढीच्या यात्रेत पुन्हा वादाची ठिणगी; मुस्लिम व्यापाऱ्यांच्या प्रवेशावर ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय )
 

मात्र, दुसरीकडे तिच्या कुटुंबाने हे सरळसरळ अपहरण असल्याचे म्हटले होते. डोळ्यात चटणी फेकून आणि मारहाण करून मुलीला बळजबरीने नेण्यात आले, असा आरोप तिच्या भावाने केला होता.

Advertisement

भिगवणचे हे प्रकरण केवळ कौटुंबिक वादापुरते मर्यादित राहिले नव्हते. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. मुलीला बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला होता. आता खुद्द मुलीनेच आपला जबाब बदलून कुटुंबाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सध्या न्यायालयाने तिचा ताबा आई आणि मामाकडे सोपवण्याचे आदेश पारित केले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Topics mentioned in this article