Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात, अल्टो कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकच्या दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरीत कारचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करुन कुटुंबीय आपल्या घरी निघाले होती. त्यावेळी धक्कादायक प्रकार घडला. 

नाशिकच्या दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अल्टो कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अल्टो कार रस्त्याशेजारील नाल्यात पलटली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सर्व जणांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक mh 04 dy 6642 व एका मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नाल्यामध्ये पलटी झाली. या अपघातात आल्टो गाडीमधील  1)देविदास पंडित गांगुर्डे, वय -28, 2) मनीषा देविदास गांगुर्डे, वय -23 वर्षे, 3)उत्तम एकनाथ जाधव, वय - 42 वर्षे, 4) अल्का उत्तम जाधव, वय - 38 वर्षे, 5)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, वय - 45 वर्षे, 6)अनुसया दत्तात्रय वाघमारे, वय - 40 वर्षे, 7)भावेश देविदास गांगुर्डे, वय - 02 अशी मृतांची नावं आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - Crime News: माय-लेकाची घरात घुसून हत्या, पंढरपुरातील खळबळजनक घटना

तर मोटर सायकलवरील तरुण मंगेश यशवंत कुरघडे वय-25, 2) अजय जगन्नाथ गोंद वय -18 वर्षे जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. यातील अल्टो गाडीतील मृतांचे नातेवाईकाचे मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते. ते परत त्यांचे गावी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली होती. यात गाडी लॉक झाली होती. त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेलं. तर बुडून सात जणांचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. 

Advertisement
    Topics mentioned in this article