आयकर विभागाने नांदेडमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. त्यात जवळपास 14 कोटींची रोकड, 8 किलो सोने यासह जवळपास 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने मिळाल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली ते भंडारी बंधू हे जमिन खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी एक खाजगी फायनान्स कंपनीही स्थापन केली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयकर विभागाने शुक्रवारी नांदेडच्या भंडारी बंधुंच्या कार्यालय आणि घरावर छापेमारी केली होती. त्यात एकूण 170 कोटी रुपयांचे बेहिशोबी धन आणि व्यवहार आढळले आहेत. या 170 कोटी रुपयांमध्ये 8 किलो सोने, 14 कोटी रोख रक्कम आणि उर्वरित रकमेच्या नोंदी सापडल्या आहेत. असे मिळून हा आकडा 170 कोटी होतोय. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक आयकर विभागाने केली.
हेही वाचा - सलमान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, सहावा आरोपी अटकेत
या कारवाईत तब्बल 14 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल 14 तास लागले. सकाळी दहा ते रात्री बारा वाजे पर्यंत ही रोकड मोजली जात होती. दोन दिवस ही छापेमारी सुरू होती. त्यावेळी फक्त हाती कागदपत्र लागली होती. मात्र संबधित व्यवसायिकाच्या भावाच्या घरावर छापेमारी करण्यात आली. त्यावेळी बाहेरून अतिशय जुनाट घर दिसत होते. मात्र आतमध्ये ते अलिशान होते. घरात महागड्या वस्तू होत्या. फर्निचरही महागडे होते. इथल्या एका गाडीच्या खोळामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड लपवली गेली होती. या छापेमारीसाठी 80 अधिकारी कार्यरत होते. त्यांनी सात ठिकाणी 72 तास कारवाई केली.