अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे त्या पैकी एकाचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला आहे. आता पोलिसांनी हरियाणातून आणखी एकाला अटक करण्यात आलीय. ही या प्रकरणातली सहावी अटक आहे. हरपाल सिंह असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या आधी मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानातून पाचव्या आरोपीला अटक केली होती. या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असे होते. या आधी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना अटक करण्यात आले होते. या दोघांना पैसे पुरवणे आणि सलमानच्या घराबाहेर पैसे पुरवण्याचा त्याच्यावर आरोप होता.
हेही वाचा - घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांचा मृत्यूला कोण जबाबदार?
सलमान खान निवासस्थानावरील गोळीबार प्रकरणात आतापर्यंत सागर पाल (21) आणि विक्की गुप्ता (24), मोहम्मद चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. या आरोपींना मुंबईत घर भाड्याने घेणं, हल्ला करण्यासाठी बाईक खरेदी करणे यासाठी एक लाख रुपये देण्यात आले होते. त्यांना सुपारीसाठी किती पैसे देणार याबाबत सांगण्यात आले नव्हते. या प्रकरणात अनुज थापन यालाही अटक करण्यात आली होती. मात्र त्याने पोलिस कोठडीतच आत्महत्या केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world