पहाटे भागलपुरच्या पोलीस लाइन्सच्या 38 क्रमांकाच्या क्वार्टरचा दरवाजा दूधवाल्यानं ठोठावला. नेहमीप्रमाणे सकाळी दूधवाला घरी पोहोचला होता. मात्र कोणीच दार उघडत नव्हतं. आदल्या दिवशी सोमवारीही कोणी दार उघडलं नव्हतं. म्हणून दुधवाल्याचं दार ढकलून दरवाजा उघडला आणि आतले दृश्य पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
बिहारच्या भागलपूरमध्ये एका कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नीतू ही पोलीस दलात कार्यरत होती. या हत्येमागे कोण जबाबदार आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घरातून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यानुसार या कुटुंबातील महिलेने (नीतू) तिची दोन्ही मुलं आणि सासूची हत्या केली. यामध्ये महिलेचा पती पंकजने पुढे लिहिलं की, माझी पत्नी नीतूने माझी मुलं आणि आईची हत्या केली. म्हणून मी तिची हत्या करून स्वत:ला संपवत आहे. या प्रकरणाचा विविध प्रकारे तपास केला जात आहे. या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिलय...
या सुसाईड नोटमध्ये पंकजने तिची पत्नी नीतूवर दोन मुलं आणि आईच्या हत्येचा आरोप लावला आहे. मात्र केवळ सुसाइट नोटवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात कोणी प्रत्यक्षदर्शी नसल्याने याचा अधिकांश तपास फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदनाच्या अहवालावर अवलंबून असेल.
नीतूचा पती पंकजने मुलांसह आई, पत्नी या चौघांची हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दृष्टिकोनातूनही पोलीस पुरावे गोळा करीत आहे. करण्यात व्यस्त आहेत. पंकजने आपल्या आईची हत्या का केली याबाबतही सवाल उपस्थित केले जात आहेत. नीतू आणि पंकजचं भांडण सोडविण्यासाठी त्याची आईच पुढे येत असल्याचं शेजारच्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यामुळे या हत्येमागील नेमकं कारण काय असेल, याचा तपास केला जात आहे.
नक्की वाचा - मुंबईत घरातून सुरू होता बेकायदेशीर व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड
या प्रकरणातील पाच महत्त्वाचे प्रश्न...
लहान मुलं आणि वृद्ध महिलेची हत्या का केली?
पंकजनेच सर्व चार जणांची हत्या केल्याची शक्यता...
सुसाईड नोटमधील खरं मानलं तर नीतूला कोणी बाहेरच्या व्यक्तीने साथ दिल्याचा संशय
पंकजा स्वत:च्याच आईची हत्या का करेल?
या संपूर्ण हत्याकांडात कोणी बाहेरच्या व्यक्तीचा हात तर नाही?