जाहिरात

Crime News: मोठा घोटाळा! बनावट सरकारी अधिकारी बनून 200 कोटींची फसवणूक

प्रत्यक्षात कोणताही रबरचा व्यवसाय झाला नव्हता. तो फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला होता.

Crime News: मोठा घोटाळा! बनावट सरकारी अधिकारी बनून 200 कोटींची फसवणूक

एका व्यक्तीने बनावट सरकारी अधिकारी बनून 200 कोटींहून अधिक रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे. जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी छापे टाकले, तेव्हा हे प्रकरण समोर आले. ईडीची ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे. हा मोठा घोटाळा त्रिपुरामध्ये उघडकीस आला आहे. 

अनेक बनावट कंपन्या आणि संस्थांची निर्मिती
या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्पल कुमार चौधरी आहे. जो सध्या हरियाणाच्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध पश्चिम बंगाल पोलिसांनी अनेक FIR नोंदवल्या आहेत. चौधरीने अनेक बनावट कंपन्या आणि संस्था तयार केल्या. ज्यांची नावे सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सशी मिळतीजुळती होती. तो स्वतःला भारत सरकारचा एक मोठा अधिकारी असल्याचे सांगायचा. लोकांना सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळायचा.

नक्की वाचा - लेक की हैवान? आईचे कुऱ्हाडीने तुकडे-तुकडे केले, नंतर शेजारी बसून गाणे गायले, थरकाप उडवणारा Video

200 कोटींहून अधिकचा घोटाळा 
आरोपी उत्पल कुमार चौधरी याने "डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन, त्रिपुरा"चा अधिकारी बनून अनेक शैक्षणिक संस्था आणि व्यक्तींना फसवले. याशिवाय, त्याने "चलताखली स्वामीजी सेवा संघ" नावाच्या NGO वर कब्जा केला.  त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर केली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, 200 कोटींहून अधिक रुपयांची  रक्कम दिल्ली, हरियाणा आणि कोलकाता येथील कंपन्यांमध्ये फिरवण्यात आली.

त्रिपुरा सरकारमधील काही मोठ्या अधिकाऱ्यांशी जवळीक
प्रत्यक्षात कोणताही रबरचा व्यवसाय झाला नव्हता. तो फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला होता. नंतर मोठी रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली. तपासामध्ये हे देखील समोर आले आहे की, चौधरीची त्रिपुरा सरकारमधील काही मोठ्या अधिकाऱ्यांशी जवळीक होती. हे अधिकारी त्याला मोठा अधिकारी म्हणून व्यापाऱ्यांशी भेटवून देत होते. याचा फायदा घेऊन त्याने अनेक लोकांना सरकारी कंत्राटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केली.

नक्की वाचा - Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंची पुन्हा भेट; उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी VIDEO

बनावट मुद्रा आणि बनावट ओळखपत्रे 
छापेमारीदरम्यान, ईडीला त्रिपुरा सरकारच्या अनेक विभागांच्या बनावट मुद्रा आणि बनावट ओळखपत्रांसोबतच गृह मंत्रालय, भारत सरकारचे बनावट ओळखपत्रेही मिळाली आहेत. तसेच, 7 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. सुमारे 60 लाख रुपयांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, रिअल इस्टेट आणि जमिनीतील गुंतवणुकीशी संबंधित पुरावे देखील मिळाले आहेत. सध्या ईडीचा तपास सुरू असून, या संपूर्ण घोटाळ्यात सामील असलेल्या इतर लोकांची भूमिकाही तपासली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com