Chadrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे पाय पसरू पाहणाऱ्या अवैध गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ...
गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात 'मकोका' लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. २५ मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करांवर 'मकोका'ची कठोर कारवाई करण्यात आली.
आतापर्यंतची सर्वात मोठी अन् ऐतिहासिक कारवाई...
चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे पाय पसरू पाहणाऱ्या अवैध गोवंश तस्करीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. कुख्यात तस्कर इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध थेट 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश तस्करीच्या प्रकरणात जिल्ह्यात 'मकोका' लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, मूळ-चंद्रपूर मार्गावरून तेलंगणाकडे दोन ट्रकमधून अवैधरीत्या गोवंश नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही ट्रक अडवले. तपासणी केली असता, त्यात तब्बल ६३ गोवंश अत्यंत क्रूरपणे कोंबलेले आढळले. जनावरांचे हात, पाय आणि तोंड घट्ट बांधण्यात आले होते, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय नव्हती. दुर्दैवाने, या छळात दोन जनावरांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात कत्तलीच्या उद्देशाने ही वाहतूक सुरू होती. पोलिसांनी रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मुख्य आरोपी इम्रान बब्बू शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गोवंश तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. ही टोळी सातत्याने सक्रिय असल्याचे पाहून जिल्हा पोलिसांनी मकोका लागू करण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. २५ मे रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळताच तस्करांवर 'मकोका'ची कठोर कारवाई करण्यात आली.
मकोका काय आहे?
मकोका हा कायदा गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध वापरण्यात येतो, जिथे गुन्हेगारी संघटित स्वरूपात, आर्थिक फायद्यासाठी केली जाते. यामध्ये खंडणी, खून, गुन्हेगारी षड्यंत्र, मालमत्तेचा बेकायदेशीर वापर यांचा समावेश होतो. मकोका कायदा संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपविण्यासाठी तयार केलेला एक विशेष कायदा आहे. महाराष्ट्राशिवाय दिल्लीतही हा कायदा लागू आहे. मकोकाअंतर्गत दोषी आढळल्यास कमीत कमी पाच वर्षांपासून अधिकांश मृत्यूदंडापर्यंत किंवा जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.