Crime News: 'स्पेशल 26'! बनावट पोलिस बनवले, छापे ही टाकायला लावले, तरुणांना असं काही गंडवले की...

पैसे दिल्यानंतर दोन दिवसांनी ठग राहुल कुमारने खाकी वर्दीसोबत ग्राम रक्षा दलाचे बनावट ओळखपत्रही या तरुण तरुणींना दिले.

जाहिरात
Read Time: 3 mins

स्पेशल 26 हा चित्रपट सर्वांना माहित असेल. त्यात चोरी करण्यासाठी बनवाट सीबीआय ऑफीसर बनवले जाता. त्यांना छापा टाकायला सांगितला जातो. त्या बेरोजगार तरुणांनाही आपल्याला नोकरी लागली याचा आनंद असतो. त्यातून ते कृत्य करत जातात. हे झालं चित्रपटातलं. पण तशीच खरी खटना बिहारमधल्या पुर्णीया जिल्ह्याच घडली आहे. इथं नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून पैसे उकळण्यात आलं. नंतर त्यांना बनावट पोलिस ही बनवण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बिहार खरोखरच अजब आहे. इथल्या गुन्हेगारीच्या घटना तर त्याहूनही विचित्र आहे. याचे ताजे उदाहरण पूर्णिया जिल्ह्यातील समोर आले आहे. इथे काही आरोपींनी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले. पुढे या तरुणांना बनावट पोलीस बनवले. ते इथपर्यंत थांबले नाहीत. ज्यांना बनावट पोलिस बनवले होते, त्यांना वाहनांची तपासणी आणि दारू पकडण्यासाठी छापेमारीही करायला लावली. धक्कादायक बाब म्हणजे, त्या तरुणांना पोलिसांच्या वर्दी ही दिली जात होती. आपण खरे पोलीस नसून बनावट आहोत याची माहिती त्यांनाही नव्हती. त्यांना वाटले होते की, त्यांची नोकरी लागली आहे. कुणाला संशय येवू नये यासाठी आरोपींनी एका शाळेत बनावट पोलीस चौकीही तयार केली होती.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Rinku Singh Engagement: सिक्सर किंग रिंकू सिंहचा साखरपूडा, जेवणाचा 'हा' होता खास मेन्यू, 'यांनी' लावली हजेरी

या प्रकरणाचा परदाफाशनंतर झाला. ज्या वेळी  फसवणुकीचा बळी ठरलेल्या अनेक युवक-युवतींनी मास्टरमाइंड राहुल कुमार साहच्या घरी पोहोचून दिलेले पैसे परत मागितले. या दरम्यान, आरोपी राहुल कुमार साह फरार झाला. राहुलने 300 पेक्षा जास्त युवक-युवतींकडून 10 ते 15 हजार रुपयांची वसुली केली होती. पैसे घेवून नोकरी देतो असं त्याने सांगितलं होतं. जवळपास एक वर्ष हा खेळ सुरू होता. पोलिस आणि होमगार्डमध्ये शिपाई आणि चौकीदाराची सरकारी नोकरी दिली जाईल असं आरोपी राहुलने सांगितलं होतं. यासाठी 10 हजार रुपये जमा करावे लागतील असं ही तो बोलल्याचं पीडित सांगतात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला

पैसे दिल्यानंतर दोन दिवसांनी ठग राहुल कुमारने खाकी वर्दीसोबत ग्राम रक्षा दलाचे बनावट ओळखपत्रही या तरुण तरुणींना दिले. त्यानंतर 5 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसेच, राहुल कुमार साहने फसवणूक केलेल्या युवक-युवतींना दोन महिने खाकी वर्दी घालून कसबा पोलीस स्टेशन परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट गस्ती दल बनवून कामही करवून घेतले. ज्यांना बनावट नोकरी दिली होती, त्यांना सांगितले होते की, 22 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. त्यावर सर्व तरुण तरुणींनी विश्वास ठेवला होता. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Jalindar Supekar: हगवणे कुटुंबाला मदत ते 500 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप .. अखेर जालिंदर सुपेकर बोलले!

राहुलने ज्या युवक-युवतींना बनावट बिहार ग्रामीण रक्षा दल आणि दलपतीची नोकरी दिली होती, त्यांना वर्दी, ओळखपत्र आणि पोलिसांची काठीही दिली होती. तसेच, या युवक-युवतींकडून ग्रामीण भागात वाहन तपासणी अभियान राबवले जात होते. वाहनचालकांना बनावट चलनाची पावतीही दिली जात होती. जर एक हजार रुपयांची वसुली झाली, तर तैनात बनावट रक्षा दलाला 200 रुपये देऊन उरलेले 800 रुपये सरकारी चलनापोटी राहुल कुमार साह स्वतःकडे ठेवत असे. बनावट ग्राम रक्षा दल दारूही पकडत असे. दारू पकडून मोठी रक्कम वसूल करून दारूसह दारू माफियांना सोडून देत असे.