- पटना के छात्रा कोमल कुमारी मैट्रिक परीक्षा में देर से पहुंचने पर प्रवेश नहीं मिलने से आहत हुई थी.
- कोमल परीक्षा केंद्र पर निर्धारित समय के बाद पहुंची थी, जिससे गेट बंद कर दिया गया और उसे प्रवेश नहीं मिला.
- गेट खुलवाने के लिए कोमल ने परीक्षा केंद्र पर लगातार निवेदन किया लेकिन किसी ने उसकी बात नहीं मानी.
SSC Exam : दहावीच्या परीक्षेत पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे प्रवेश नाकारल्याने एका विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पाटण्यातील मसौढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजचक गावात घडली आहे. कोमल कुमारी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.
कोमल दहावीत होती. मंगळवारी बरनी येथील परीक्षा केंद्रावर तिचा पेपर होता. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी ती सोमवारीच महाराजचक येथील आपल्या नातेवाईकांच्या गावी गेली होती. तिथून परीक्षा केंद्र सुमारे ६ किलोमीटर अंतरावर होतं. सकाळी ९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक होतं. परंतु कोमलला परीक्षा केंद्रावर पोहोचला उशीर झाला, ती साधारण ९:१० वाजता तेथे पोहोचली. अवघ्या १० मिनिटांच्या विलंबामुळे केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.
सर, प्लीज गेट उघडा, माझ्या करिअरचा प्रश्न आहे...
परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर गेट बंद असल्याचं पाहून कोमलने गेट वाजवण्यास सुरुवात केली. ती वारंवार विनवणी करत होती, सर, प्लीज गेट उघडा, परीक्षा ९:३० वाजता सुरू होणार आहे. मला फक्त १० मिनिटे उशीर झाला आहे. अजून २० मिनिटं शिल्लक आहेत. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मात्र, तिचं कोणीही ऐकलं नाही. खूप प्रयत्न करूनही गेट न उघडल्याने ती निराश होऊन परतली.
सोशल मीडियामुळे ओळख पटली...
निराश झालेली कोमल काही वेळात नदौल येथे पोहोचली आणि ट्रेनमध्ये बसली. तरेगना आणि मसौढी कोर्ट स्टेशनच्या दरम्यान महाराजचक गावाजवळ तिने धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला तिची ओळख पटली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला. ज्यानंतर ग्रामस्थांनी तिची ओळख पटवून कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील मंटू यादव बाहेर मजुरी करतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परीक्षा नियमांच्या अति-कठोरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |