Viral Video: नात्यामधील प्रेमसंबंध आणि त्यामधून नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना अनेकदा उघड होत असतात. याच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणात एका 24 वर्षांच्या तरुणाला बेदम मारहणार करुन त्याला त्याच्या काकूबरोबर लग्न करण्यास भाग पाडले. या तरुणाचे त्याच्या काकूबरोबर प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
बिहारमधील सुपौल जिल्ह्यात ही घटना २ जुलै रोजी घडली. मिथिलेश कुमार मुखिया नावाच्या या तरुणाचे कथितरित्या अपहरण करण्यात आले आणि त्याला भीमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवछपूर वॉर्ड क्रमांक 8 मध्ये राहणारे त्याचे काका शिवचंद्र मुखिया यांच्या घरी नेण्यात आले.
(नक्की वाचा: Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
मिथिलेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवचंद्र यांची पत्नी रीटा देवीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या आरोपावरून जमावाने त्यांच्या मुलाला मारहाण केली. शिवचंद्र आणि रीटा यांना चार वर्षांचा मुलगा आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये मिथिलेशला रॉडने मारहाण होताना दिसत आहे. त्यानंतर रीटालाही घटनास्थळी आणून ग्रामस्थांनी मारहाण केली. त्यानंतर मिथिलेशला रीटाच्या कपाळाला सिंदूर लावण्यास कथितरित्या भाग पाडण्यात आले.
मिथिलेशचे वडील रामचंद्र यांनी सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या मुलाला पाठ, मान आणि हातांना गंभीर दुखापती झाल्याचे त्यांनी सांगितले.
( नक्की वाचा: Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी! )
एका ग्रामस्थाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आरोपींनी तेथून पळ काढला.
रामचंद्र यांनी सांगितले की, त्यांच्या मुलावर राजा कुमार, विकास मुखिया, शिवचंद्र मुखिया, सूरज मुखिया, प्रदीप ठाकूर, सुरेश मुखिया (सर्व जीवछपूरचे रहिवासी) आणि राहुल कुमार व साजन साहनी (भीमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलागंजचे रहिवासी) यांनी हल्ला केला.
भीमपूरचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) मिथिलेश पांडे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिथिलेशला सुरुवातीला नरपतगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु नंतर गंभीर अवस्थेत त्याला अररिया सदर रुग्णालयात पाठवण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.