जाहिरात

कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक! विमानतळ अधिकाऱ्यानं महिलेच्या वेशात का केला आयुष्याचा शेवट?

Man in Women Cloth : ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, अंगावर ब्लाऊज, सलवार आणि नाईटी हा वेश त्यांनी का परिधान केला होता हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कपाळावर टिकली, ओठांवर लिपस्टिक! विमानतळ अधिकाऱ्यानं महिलेच्या वेशात का केला आयुष्याचा शेवट?
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:


ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, अंगावर ब्लाऊज, सलवार आणि नाईटी ही एखाद्या पुरुषाची आवड असू शकते का? हा प्रश्न विमानतळ अधिकारी आशिष चौंसाली यांच्या मृत्यूनंतर उभा राहिलाय. आशिष उत्तराखंडमधील (Uttarakhand Suicide) पंतनगर विमानतळावर ट्रॅफिक कंट्रोल टीममध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होते. आशिष यांचा मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या? हा तपास पोलीस करक आहेत. पण, त्यांच्या शेवटच्या गेटअपमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालंय. 

आशिष यांचा तो वेश पाहून त्यांना ओळखणाऱ्या सर्वांनाच धक्का बसलाय. त्यांचा मृतदेह एका खोलीत फासाला लटकलेला होता. पण, धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी मृत्यूपूर्वी महिलांचा पोशाख घातला होता. आशिषचं वागणं पाहून असं कधीही वाटलं नव्हतं असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणता आजार होता का?

आशिष यांना कोणता आजार होता का? याचा तपास सध्या केला जातोय. प्राथमिक तपासामध्ये त्यांचा मृत्यू ही आत्महत्या होती, असा अंदाज आहे. अनेकदा मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी सुप्त इच्छा दडलेली असते. आशिष यांच्या मनातही एखादी इच्छा असावी, अशी शक्यता आहे. 

35 वर्षांचे आशिष पिथौरागडचे रहिवासी होते. ते विमानतळ परिसरातील सरकारी घरामध्ये राहात होते. सोमवारी रात्री 10 वाजेपर्यंत मित्रांसोबत पार्टी केली. त्यानंतर ते झोपायला गेले. सकाळी त्यांच्या भाच्यानं दरवाजा ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून घरातील मंडळी आत गेले. त्यावेळी आतमधील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. 

( नक्की वाचा : 1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम )
 

महिलांच्या गेटअपमध्ये आयुष्याचा शेवट

आशिष यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्यावेळी ते महिलेच्या वेशात होते. त्यांनी ओढणी पंख्याला बांधून जीव दिला. त्यांनी मेकअप केला होते. त्यांच्याकडं महिलांचे कपडे कुठून आले? ते त्यांनी खरेदी केले होते की कुणाकडून मागवले होते? त्यांनी आत्महत्या केली की या प्रकरणात कुणाचा हात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

आशिष यांचा भाचा आकाश आणि मित्र भरत यांना याबाबत काहीही माहिती नव्हतं. या दोघांनीही आशिष यांना असं कधीही पाहिलं नव्हतं. भरत आणि आशिष हे चांगले मित्र आणि शेजारी होते. आशिष यांना एखादा मानसिक आजार असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत आढळली नाही. आता पोलीस त्यांनी विवाहित महिलेच्या वेशभूषेत मृत्यूला का कवटाळलं? याचा तपास पोलीस करत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com