भाजप नेत्याने आपल्या 3 पोटच्या मुलांना गोळ्या झाडून ठार केलं आहे. ऐवढेच नाही तर त्याने आपल्या पत्नीलाही गोळ्या घातल्या आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये घडली. या प्रकरणी भाजप नेता योगेश रोहिला याला पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या आधी ही योगेश याच्या कुटुंबातील आई वडीलांसह चार बहीणींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. शिवाय पहिल्या पत्नीचाही असाच मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
योगेश रोहिला हा भाजपच्या जिल्हा कार्यकारणीचा नेता आहे. तो उत्तरप्रदेशातल्या सांगाठेडा या गावात राहातो. हे हत्याकांड ही याच गावात घडलं आहे. शनिवारी दुपारी रोहिला याची पत्नी बरोबर भांडण झालं. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलने पत्नी नेहा, 11 वर्षाची मुलगी श्रद्धा, 6 वर्षाचा मुलगा शिवांश आणि 4 वर्षाचा मुलगा देवांश यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्याने त्यांच्या थेट डोक्यात झाडल्या. या हल्लानंतर सर्व जण खाली कोसळले. गोळ्यांच्या आवाजाने गावात एकच धावपळ उडाली. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसही तातडीने गावात दाखल झाले.
गोळीबार केल्यानंतर जखमी झालेली पत्नी आणि मुलांना गावकऱ्यांनी गंगोह इथल्या हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवले. मात्र तिथे 11 वर्षाच्या श्रद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तर अन्य तिघांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे उपचारा दरम्यान 4 वर्षाचा देवांश आणि 6 वर्षाचा शिवांश यांनी शेवटच्या श्वास घेतला. त्यावेळी भाजप नेत्याची पत्नी नेहा ही मात्र गंभीर जखमी होती. तीला वाचवण्याची प्रयत्न केले जात आहेत. मात्र तिची स्थिती अतिशय वाईट होती असं डॉक्टरांनी सांगितलं.
या घटनेनंतर पोलिसांनी लेगचच आरोपी भाजप नेता योगेश रोहिला याला उटक केले आहे. हत्या केल्यानंतर योगेश यानेच पोलिसांनी फोन करून आपण हत्या केल्याचे सांगितले. शिवाय त्याने आपला गुन्हा ही कबुल केला आहे. तो आपल्या पत्नीवर संशय घेत होता असं त्याने चौकशीत सांगितलं असल्याची माहिती एसएसपी रोहित सिंह सजवाण यांनी सांगितलं. या कारणावरून अनेक वेळा पती पत्नीमध्ये वाद होत होते. असाच वाद शनिवारीही झाला. त्यातून त्याने हे हत्याकांड केले. पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्याचा त्याला पश्चाताप नाही असंही पोलिसांनी सांगितलं.