Badlapur News: भाजपा आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक, हॅकर्सचा आमदारांच्या नावाने धुमाकूळ

Badlapur News:भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाने 55 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Badlapur News: लोकप्रतिनिधीच्याच नावाने फसवणुकीचा प्रयत्न झाल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बदलापूर:

Badlapur News: भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून त्यांच्या नावाने 55 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधीच्याच नावाने फसवणुकीचा प्रयत्न झाल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

हा सर्व प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला आहे. मुरबाडचे भाजपा आमदार किसन कथोरे यांचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅकर्सनी आपल्या ताब्यात घेतले. आमदार कथोरे यांचा जनसंपर्क मोठा असल्याने त्यांचा नंबर हजारो लोकांकडे जतन केलेला आहे. याच संधीचा फायदा घेत हॅकर्सनी त्यांच्या नावाचा गैरवापर केला आणि संपर्कातील अनेक व्यक्तींना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

Advertisement

हॅकर्सनी आमदार कथोरे यांच्या नावाने मेसेज पाठवून तातडीने 55 हजार रुपये बँक खात्यावर पाठवण्याची मागणी केली. अनेक कार्यकर्त्यांना आणि ओळखीच्या व्यक्तींना हे मेसेज प्राप्त झाले. सुरुवातीला अनेकांना हे मेसेज आमदारांकडूनच आले असावेत असे वाटले, मात्र थेट पैशांची मागणी केल्याने संशय बळावला. ही बाब लक्षात येताच आमदारांच्या कार्यालयातून तातडीने हालचाली सुरू झाल्या.

( नक्की वाचा : Titwala News: टिटवाळ्यात 600 कोटींचा 'चाळ झोल';हातोडा पडला, तरी इमारत उभी! वाचा धक्कादायक सत्य )

सायबर पोलिसांत तक्रार आणि तपास

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच आमदार किसन कथोरे यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि अधिकृत तक्रार दाखल केली. हॅकर्सनी कोणाची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी पोलीस आता तांत्रिक तपास करत आहेत. आमदारांच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्याचा हा एक मोठा कट असल्याचे दिसून येत आहे.

( नक्की वाचा : Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी )

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

या घटनेनंतर आमदार किसन कथोरे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

माझ्या नंबरवरून किंवा नावाने पैशांची मागणी करणारा कोणताही मेसेज आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन आमदारांनी केले आहे. तसेच अशा संशयास्पद मेसेजबाबत तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून फसवणूक टाळता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article