राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचा सख्खा मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आतापर्यंत पैशांसाठी त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र तपासात अशी गोष्ट समोर आली आणि पोलिसांनाही धक्का बसला. सतीश वाघ यांच्या हत्येनंतर 5 आरोपींना दोन दिवसातच पकडण्यात पोलिसांना यश देखील आलं. पैशाच्या वादातून भाडेकरूनेच हत्या केल्याचं उघड झालं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र पोलिसांना वेगळ्याच कारणाचा संशय येत होता. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, वरकरणी सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी झाली असं वाटत होती पण तपासाची चक्र फिरल्यानंतर यात अनैतिक संबंधांचा अँगल पोलिसांच्या हाती लागली. पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी केली आणि त्यानंतर समजलं की सतिश वाघ यांच्या हत्येची मुख्य सूत्रधार दुसरं तिसरं कुणी नसून त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ ही होती. मोहिनी वाघ यांचे त्यांच्याच मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच सतीश वाघ यांच्या हत्येचा प्लान करण्यात आला.
नक्की वाचा - Hingoli Crime : घटस्फोटाची मागणी अन् सासरवाडीत रक्ताचा पाट वाहिला, पोलिसाच्या कृत्याने हिंगोली हादरलं!
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला काल (बुधवारी) अटक केली आहे. मोहिनी वाघ सध्या 48 वर्षांची असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघच्या मुलाचा मित्र आहे. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.
23 वर्षांपासून मामी अन् अक्षयमध्ये होते प्रेमसंबंध...
पती सतिश वाघ रोज मारहाण करत असल्याचा जबाब मोहिनी वाघने पोलीस चौकशीत दिला आहे. 2013 पासून अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघचे संबंध होते. 2016 साली सतिश वाघ यांना याची कुणकुण लागली. यानंतरच सतिश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या संसारात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. 2001 पासून अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ एकमेकांना ओळखत होते. 2013 साली अक्षय आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. 2013 साली अक्षय 21 वर्षांचा आणि मोहिनी वाघ 37 वर्षांचा होता. मधल्या काळात अक्षय जावळकरने सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. 2016 ला अक्षय जावळकरचं लग्न झालं. लग्नानंतरही अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले.
नक्की वाचा - Crime News : 24 वर्षांच्या तरुणीनं केलं 6 जणांशी लग्न, 7 व्या चा 'बँड' वाजवण्याची होती तयारी, पण...
अक्षयने दिली पवनला सुपारी...
आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्यानंतर मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले. अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.