जोधपूरमध्ये अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एका महिलेला तब्बल दोन वर्षे लुबाडल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. पती-पत्नीच्या वादाचा फायदा घेत एका तांत्रिक जोडप्याने 'प्रेतात्मे' घरात येत असल्याचा बनाव केला आणि सुख-शांतीच्या नावाखाली लाखो रुपये आणि दागिने हडपले. फसवणूक झालेल्या कृतिका रामदेव यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर बोरानाडा पोलिसांनी आरोपी दाम्पत्य आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला जाळ्यात ओढले!
पीडित कृतिका रामदेव यांचे 2016 मध्ये लग्न झाले. त्यांच्या घरात सतत भांडणे होत असत. यावर तोडगा निघेल यासाठी 2022 मध्ये तिची मैत्रीण आभा शाहने सरदारपुरामधील कुंडली पाहणाऱ्या Anisha सोबत तिची घडवली. या अनीशाने कृतिकाला सांगितले की, तिच्या कुटुंबावर जादूटोणा करण्यात आला आहे. याच अंधश्रद्धेचा फायदा घेत 2022 ते मार्च 2025 या दोन वर्षांच्या काळात अनीशाने जादूटोणा काढण्याच्या नावाखाली कृतिकेकडून दर महिन्याला 15 ते 25 हजार रुपये घेतली. आता पर्यंत 4 ते 5 लाख रुपयांचे दागिने ही लुबाडले.
मंगलसूत्र मागितले, तर पतीला मारहाण!
फसवणूक करण्यासाठी अनीशा एका खोलीत मेणबत्ती लावून खोटे रडायची. 'तुमच्या सासरच्या व्यक्तीची प्रेतात्मा घरात आली आहे' असे सांगून कृतिकाला घाबरवायची. या लुबाडणुकीत तिचा पती Sarwar आणि मुलगा Mohd. Wasim यांचाही समावेश होता. जेव्हा त्यांनी पीडितेचे मंगलसूत्र पूजा-विधीच्या नावाखाली घेतले आणि कृतिकाच्या पतीने ते परत मागितले, तेव्हा अनीशाने आपले बिंग फुटू नये म्हणून चक्क किन्नरांना बोलावून पती-पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या तांत्रिक जोडप्याने पीडितेच्या पतीच्या एका मित्राच्या पत्नीलाही फसवले असल्याचे उघड झाले आहे.