BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक

BMW Hit and Run Case Mihir Shah Arrested : मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
B
मुंबई:

BMW Hit and Run Case  Mihir Shah Arrested : मुंबईतल्या वरळीमध्ये भरधाव कारनं कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर अटक करण्यात आली आहे. या अपघातानंतर मिहीर विरारमध्ये लपून बसला होता. या घटनेनंतर तब्बल 60 तासांनी मिहीरला अटक करण्यात आली आहे. मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी शहापूरमधून ताब्यात घेतलं आहे. मिहीरला पळून जण्यात मदत करणाऱ्या 12 जणांनाही अटक करण्यात आली आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 मिहीर हा शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. आरोपीनं BMW कारनं या दम्पत्याला उडवण्यापूर्वी काही तास आधीचं एक बिल व्हायरल झालं आहे. 18,730 रुपयाचं हे दारुचं बिल असल्याची माहिती तपासात उघड झालीय. या घटनेनंतर मिहीर फरार असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 6 पथकं स्थापन करण्यात आली होती.

मिहीर शहाचे वडील राजेश आणि त्याचा ड्रायव्हरला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलीय. या दोघांवर मिहीरला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.

( नक्की वाचा : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा

हा अपघात झाला ते वाहन मिहीर शहाच्या नावानं रजिस्टर आहे. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिहीरनं अपघातानंतर त्याच्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आहे. या प्रकरणातील पीडित दाम्पत्याला दोन मुलं आहेत. या अपघातानंतर जखमी प्रदीप यांना माध्यमांसमोर बोलताना अश्रू अनावर झाले. 'मला दोन मुलं आहेत. मी आता काय करु? ती मोठी माणसं आहेत. त्यांना कुणी काही करणार नाही. आम्हाला त्रास सहन करावा लागेल,' अशी भावना प्रदीप यांनी व्यक्त केली होती.