Shilpa Shirodkar car accident : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या कारला अपघात, Cityflo बसची जबर धडक

या अपघातानंतर बस कंपनीने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याबाबत शिल्पा शिरोडकरने संताप व्यक्त केला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Shilpa Shirodkar car accident : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्या कारचा अपघात झाला आहे. सिटीफ्लोच्या बसने तिच्या कारला मुंबईत धडक दिल्याची माहिती आहे. या धडकेत शिल्पाची गाडी मागच्या बाजूने पूर्णपणे डॅमेज झाली आहे. अभिनेत्रीने इन्टाग्रामवर आपल्या डॅमेज झालेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. या अपघातानंतर बस कंपनीने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याबाबत संताप व्यक्त केला. 

शिल्पाने या प्रकरणात तक्रार नोंदवून मदत केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानले. शिल्पाने असंही म्हटलं की, या अपघातात तिच्या टीममधील कोणत्याही सदस्याला दुखापत झालेली नाही. (Shilpa Shirodkar slams Cityflow bus company)

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक...

शिल्पा शिरोडकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबत माहिती दिली आहे. आज सिटीफ्लोची एक बस माझ्या कारला मागून धडकली. सिटीफ्लोचे मुंबईतील ऑफिसचे  प्रतिनिधित्व करणारे योगेश कदम आणि विलास मानकोटे यांनी ही जबाबदारी ड्रायव्हरची असल्याचं सांगून हात झटकले. ही माणसं किती क्रूर आहेत? ड्रायव्हर किती कमावू शकतो!" अशा आशयाची पोस्ट शिल्पाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.


शिल्पा शिरोडकरने मुंबई पोलिसांचे मानले आभार...

शिल्पा शिरोडकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, मुंबई पोलिसांचे आभार...त्यांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय माझी तक्रार नोंदवून घेतली. मात्र या घटनेची जबाबदारी घेण्यास कंपनीने नकार दिला. सुदैवाने या अपघातात माझ्या टीमला काही झालं नाही. मात्र काहीही होऊ शकलं असतं. 

Advertisement


 

Topics mentioned in this article