जाहिरात

BIG NEWS: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते.

BIG NEWS: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती
पुणे:

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंड मळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात होते. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार सुनिल शेळके यांनी पाच ते सहा जण दगावल्याची माहिती दिली आहे. ही घटना घडल्यानंतर बचावकार्य तातडीने सुरू केले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.  सहा जण दगावले असल्याचं यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली आहे. ते ही घटनास्थळी थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हा पूल आहे. छोटा सिमेंटचा अरुंद असा हा पूल होता. तो लोखंडी होता. शिवाय जून पुल होता. तोच पुल कोसळला आहे. एनडीआरएफच्या दोन टीम पोहचल्या आहेत. त्यांनी बचाव कार्य तातडीने सुरू केले आहे. नक्की किती जण वाहून गेले आहेत हे आताच सांगणे कठीण आहे.  याबाबत थोड्या वेळात माहिती देण्यात येणार आहे. पण वीस पेक्षा जास्त जण वाहून गेल्याची माहिती आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Rashmi Thackeray: ठाकरे गटाच्या कारभारात रश्मी ठाकरेंची ढवळाढवळ? गोगावलेंच्या आरोपानं ठाकरे सेना घायाळ

रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. फोटो काढत होते. त्याच वेळी हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण  बुडाले आहेत, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना वाचवण्यासाठी आता मोहिम सुरू करण्यात आली आहे. सहा जणांचा मृत्यू झाल्याचं ही बोलले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल ,मावळ वन्यजीव रक्षक टीम पोचली असून सध्या नदीत बुडालेल्या नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com