Buldhana : 60 वर्षांच्या नराधमाचं 12 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, महिलांनी शोधलं आणि...

Buldhana Crime News : ही घटना समोर आल्यानंतर गावातील महिलांनी या आंबटशौकिनाला चपलेने चोप दिला.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
बुलडाणा:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

Buldhana Crime News : घरात एकटी असलेली 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 60 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये घडली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावातील महिलांनी या आंबटशौकिनाला चपलेने चोप दिला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूरचा 63 वर्षीय व्यवसायिक सुनील बुरडवर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात गैरव्यवहारातून शेती स्वत:च्या नावावर केल्याचा आरोप आहे. या व्यवहाराला सावकारकीची किनार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Advertisement

आरोपी बुरड हा त्या गावात पोहोचला आणि ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याच्या घरी धडकला त्यावेळी घरात 12 वर्षीय मुलगी एकटीच होती.बुरडने मुलीला तिचे आईवडील कुठे आहेत? अशी विचारणा केली. आणि दुसऱ्याच क्षणी तिला जवळ ओढून विनयभंग केला. 

Advertisement

( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
 

या प्रकरानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली. तिने आरडाओरड करण्यास रुवात केली त्यामुळे आरोपी सुनील बुरड लगेच बाहेर आला आणि मोटरसायकल घेऊन तिथून पळून गेलापीडित मुलीने हा सर्व प्रकार तिची आजी आणि वडिलांना सांगितला. त्यानंतर परिवाराने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध पोक्सो 6 इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान बुरडच्या या संतापजनक कृत्याची माहिती त्याच्या गावात समजतात गावातील महिलांनी त्याचा शोध घेऊन त्याला चपलेनं बदडलं. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article