अमोल गावंडे,बुलढाणा
बुलढाणा: घरगुती वादातून जन्मदात्या मुलाने आई- वडील दोघांनाही मारहाण करुन संपवल्याची भयंकर घटना बुलढाण्यामध्ये घडली आहे. गणेश महादेव चोपडे असे या निर्दयी मुलाचे नाव आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरुन गेला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसा अगोदरची खामगाव येथे डबल मर्डरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच एका घटनेने बुलडाणा जिल्हा हादरला आहे. जन्मदात्या आई-वडिलांना मुलाने मारहाण करून ठार केल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस ठाणे हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील आरोपी गणेश महादेव चोपडे (वय 31 वर्ष) याने आपले वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कलावतीबाई महादेव चोपडे यांना लाकडीने जबर मारहाण करून त्यांचं खून केलं आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी, त्यांनी दोन्ही मृत्यू देहांचा पंचनामा करून पोस्टमार्टम साठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.