- बुलढाण्यात एका वडिलांनी मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी साठवलेले पाच लाख रुपये चोरीस गेले होते
- चोरीची घटना राजश्री शाहू विद्यालयासमोर वडिलांची गाडी उभी असताना घडली आणि काच फोडून रक्कम चोरी झाली
- पोलिसांनी तक्रारीवरून विशेष पथक नेमले आणि सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला
अमोल सराफ
मुलीने शिकावं आणि मोठं व्हावं असं प्रत्येक बापाला वाटतं. त्यासाठी बाप कसली ही परवा करत नाही. अशाच एका बापानं आपली मुंबई डॉक्टर व्हावी यासाठी पै अन् पै साठवली होती. तिच्या वैद्यकीय शिक्षणात कोणती ही अडचण येवू नये म्हणून त्यांनी पैसे साठवले होते. जवळपास 5 लाखांची रक्कम त्यांनी साठवली होती. तेच पैसे त्यांना तिच्या कॉलेजमध्ये भरायचे होते. पण त्यांच्यावर कुणी तरी नजर ठेवून होतं. त्याचा पत्ताच त्यांना लागला नाही. शेवटी त्यांनी साठवलेले पाच लाख रूपये त्यांच्या डोळ्या देखत गायब करण्यात आले. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.
ही घटना बुलढाण्यात घडली आहे. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन वडील तिच्या कॉलेजला निघाले होते. मात्र त्यांच्यावर एका चोरट्यांनी डोळा ठेवला होता. त्यांनी त्याचा पाठलाग केला. मेहेकर येथून दोन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करत ते बुलढाणा इथ पर्यंत पोहोचले. वडीलांची गाडी राजश्री शाहू विद्यालयासमोर उभी होती. त्याच गाडीची चोरांनी काच फोडली. त्यानंतर त्यातून 5 लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.
या संपूर्ण प्रकारामुळे संबंधीत मुलीचा बाप हादरून गेला. त्यांनी या घटनेची तक्रार 9 सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले होते. चोरट्यांचा शोध घेण्याचे तात्काळ आदेश दिले गेले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत चोरट्यांचा माग काढला.
अखेर चार महिन्यानंतर पोलीसांना चोरट्यांची माहिती मिळाले. हे दोघे चोरटे कर्नाटक राज्यात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली. पोलिस पथकाने तेथे धाड टाकत दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले संपूर्ण 5 लाख रुपये देखील जप्त केले आहेत. या यशस्वी कारवाईमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय बुलढाणा पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चार महिन्यानंतर संपूर्ण रक्कम संबंधीतांना मिळाली आहे. त्यामुले आता त्या मुलीच्या शिक्षणाची फी भरली जाईल. त्यानंतर तिच्या शिक्षणाचा मार्ग ही मोकळा होईल.