पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने शौच केल्याने खळबळ, 8 गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या गावकऱ्यांमध्ये संताप

विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या माणसाने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अशा प्रकारचं दुष्कृत्य करणे अमानवीय आहे. त्यामुळे अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे...

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या टूनकी ह्या गावांमध्ये 140 गाव पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये कोणी अज्ञात व्यक्तीने शौच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून सात ते आठ गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो आणि या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तींने ही कृती केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टूनकी येथील पाण्याची टाकी ही ग्रामपंचायतची नसून 140 गाव जीवन प्राधिकरण विभागाची आहे. या परिसरातील अनेक गावांना या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सकाळी या पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात सौच केल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोहोचून टाकीतील शौच साफ करण्यासाठी आदेशित केले असून येत्या दोन दिवस या गावांचा पाणीपुरवठा बंद केल्या जाणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Amravati : आधी वाहनाला धडक नंतर चाकूने भोसकलं; अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा थरार

विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या माणसाने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अशा प्रकारचं दुष्कृत्य करणे अमानवीय आहे. त्यामुळे अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे...

Topics mentioned in this article