इंदूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्झरी बसचे टायर फुटल्यानंतर अचानक बसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई आग्रा रोडवरील आडगाव येथील हॉटेल स्वागत समोर हा अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये 39 प्रवासी होते. सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
सोमा टोलच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळावरील पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, सोमा टोलचे कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं. वेळेत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व 39 प्रवासी सुखरूप आहेत, कोणालाही इजा झालेली नाही. परंतू या सर्व प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे.