Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा!

Pune School : आपली मुलं शाळेत आहेत म्हणजे ती सुरक्षित आहेत असा पालकांचा समज असतो. पण, या समजुतीला तडा देणारी घटना पुणे शहरात घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

लहान मुलं घरानंतर सर्वात जास्त वेळ हा शाळेत घालवतात. शालेय जीवनातच त्यांच्या आयुष्याची जडण-घडण होत असते. मुलांच्या जडणघडणीत आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. शाळेतच त्यांच्या भावी आयुष्याचा पाया रचला जातो. त्यामुळे शाळेतील वातावरण हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. आपली मुलं शाळेत आहेत म्हणजे ती सुरक्षित आहेत असा पालकांचा समज असतो. पण, या समजुतीला तडा देणारी घटना पुणे शहरात घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विद्येच्या माहेरघरात संतपाजनक प्रकार

पुणे हे राज्यातीलच नाही तर जगातील महत्त्वाचे शिक्षण केंद्र आहे. पुण्यातील अनेक शाळा तसंच महाविद्यालयांना मोठी परंपरा आहे. तिथं शिकण्यासाठी जगभरातील विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येनं पुण्यात येत असतात. पण, पुण्यातील पाषण भागातल्या एका प्रसिद्ध शाळेत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं उघड झालंय.

या शाळेच्या चेंजिंग रुममध्ंये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग सुरु असल्याचं उघड झालं आहे. शाळेतील शिपाई तुषार सरोदे याने हे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. तुषारला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले. त्यावेळी त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूम मध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला

Advertisement

( नक्की वाचा : भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली 6 मुलांची आई, सर्वांना टाकून झाली रफूचक्कर! वाचा Love Story )
 

सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच केला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्याव्यस्थापान ने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली. आरोपीच्या विरोधात पोक्सोसह भारतीय न्याय संहिता कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Topics mentioned in this article