Pune Crime news: अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप, अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल

काही महिन्यापूर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. शंतनु कुकडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. हा गुन्हा पुण्यात नोंदवला गेला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची पक्षातून हाकालपट्टी करा अशी मागणी आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आणि माजी आमदार रविंद्र घंगेकर यांनी केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी शंतनु कुकडे याच्याकडे होते. याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोक्सोचा गुन्हा करण्यात आला आहे. शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलीशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. 

ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीविना काही अडत नाही', बँक कर्मचारी बोलला, मनसेने चोप-चोप चोपला

काही महिन्यापूर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंतनु कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असतो त्याचमुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं.