Naxal : नक्षलवाद्यांची गुहा सापडली...मोठं मैदान, खुणाही सापडल्या; छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या ऑपरेशनला मोठं यश 

ही गुहा इतकी मोठी आहे की, यामध्ये एक हजार नक्षलवादी सहज वास्तव्य करू शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी


विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवरील करेगट्टाच्या टेकड्यांमध्ये नक्षलवाद्यांवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत सैनिकांना मोठं यश मिळाले आहे. पाच दिवसांपासून तब्बल 45 अंश तापमानात ही कारवाई सुरू होती. यामध्ये नक्षलवादी लपत असलेल्या ठिकाणी पोहोचण्यात सैनिकांना अखेर यश आलं आहे. मात्र सैनिक तेथे पोहोचण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी त्यांचे लपण्याचे ठिकाण बदलले. मात्र त्या ठिकाणी नक्षलवादी उपस्थित असल्याच्या खुणा सापडल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, एक हजारांहून जास्त लोक आरामात राहू शकतील इतकी मोठी गुहा सैनिकांना सापडली आहे. या गुहेमध्ये पाण्यापासून ते विश्रांती घेण्याच्या सर्व सुविधा आहेत. गुहेमध्ये एक मोठं मैदानदेखील आहे.  NDTV  मराठी चा हाती या नक्षलवादी गुहेचे फोटो आणि व्हिडिओ मिळाले आहेत जे सैनिकांनी ऑपरेशन दरम्यान जप्त केले आहेत.


नक्षलवाद्यांना डिहायड्रेशनचा त्रास 

सूत्रांच्या माहितीनुसार, त्या टेकड्यांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. असंही म्हटलं जात आहे की, चार दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांकडे अन्नाची कमतरता भासू लागली आहे. त्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने नक्षलवाद्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे चार महिन्यांच्या रेशनसह करेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये तळ ठोकला होता. आता मात्र नक्षलवाद्यांच्या नाकी नऊ आले आहे. मरावे किंवा आत्मसमर्पण करावे अशी परिस्थिती भेडसावत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

 
नक्षलवाद्यांकडून शांतता चर्चेचा पुढाकार 

देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांनी कोट्यवधी रुपयांचे बक्षीस घेऊन करेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. याच्या आधारे, या भागात देशातील सर्वात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. सैनिकांचा वाढता दबाव आणि मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी नेत्यांना मरणाची भीती निर्माण झाल्याची शक्यता आहे. याच कारणामुळे नक्षलवादी नेता रूपेशला या मोहिमेच्या मध्यभागी एक प्रेस नोट जारी करावी लागली आणि सरकारला ही मोहीम ताबडतोब थांबवून शांतता चर्चा सुरू करण्याचे आवाहन करावं लागलं आहे. 

Topics mentioned in this article