Crime News: रस्त्यात गाडी बंद पडली, नराधमाने डाव साधला, वनरक्षकाकडून अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीसांनी  आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: रस्त्यात दुचाकी बंद पडलेल्या तरुणीला मदतीच्या बहाण्याने जवळीक साधत वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या वनरक्षकाला गोंदिया येथून अटक करण्यात आली आहे.  रंजीत दुर्योधन असं नराधम आरोपीचे नाव आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे.  रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे  जात होती. रस्त्यात दुचाकी बंद पडली.  दोघेही दुचाकी दुरुस्त करत असताना, चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्याजवळ थांबला. 

Nagpur News: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं

त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो, असे सांगून सोबत घेतले आणि चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला. पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीसांनी  आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मनाला सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. एका गावात राहणाऱ्या दीड वर्षीय चिमुरडीवर गावातीलच एका 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे.जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात आरोपीने 18 महिन्याच्या चिमुकलीवर बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

Advertisement

याप्रकरणी पीडीतेच्या आईने जळगाव जामोद पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून नराधम आरोपी मधुकर पुंजाजी हागे वय 55 वर्ष  याचे विरुद्ध अपराध  गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यास अटक केली करण्यात आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नराधम आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ड्रायव्हरची आत्महत्या, भाजप खासदाराविरोधात गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप

Topics mentioned in this article