जाहिरात

Nagpur News: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं

खापरखेडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रोशन सोनेकरला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Nagpur News: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं

नागपूर: लग्नाची मागणी नाकारल्याच्या रागातून प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी  केल्याची संतापजनक घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथी गावात घडली. जखमी तरुणीवर नागपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Nagpur Crime: दारुमुळे वडिलांचा मृत्यू! बदला घेण्यासाठी मुलाचा भलताच प्लॅन, बारमध्ये शिरायचा अन्....

याबाबत सविस्तर माहिती अशी की,, रोशन सोनेकर (वय 32) आणि पीडित तरुणी (वय 20) हे एकाच गावात राहत असून, दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते. दरम्यान, रोशनचे एका अन्य मुलीसोबत लग्न झाले. मात्र लग्नानंतर प्रेयसीने रोशनच्या पत्नीला भेटून, “मीच रोशनसोबत लग्न करणार,” असे सांगितले. परिणामी, रोशनने 2023 मध्ये पत्नीला सोडचिठ्ठी दिली.

मात्र, नंतर प्रेयसीने रोशनसोबत लग्नास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, तेव्हा रोशनविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. या सर्व प्रकारामुळे रोशन मनात प्रचंड राग धरून होता. गुरुवारी  गुमथी गावातील हनुमान मंदिरात पीडित मुलगीपूजा करत असताना, मंदिरातच हनुमान मूर्तीसमोर रोशनने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.

घटनेनंतर गावकऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खापरखेडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रोशन सोनेकरला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ड्रायव्हरची आत्महत्या, भाजप खासदाराविरोधात गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com