Crime News: विनयभंग प्रकरणी 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

परंतु तो बाहेर असल्याचे समजताच त्याचा मोबाईल नंबर पोलिसांनी मिळवला. त्यानंतर तांत्रीक पध्दतीने त्याचा शोध घेण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

क्लासवरून घरी एकटीच जाणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या प्रकरणी ठाण्याच्या किसन नगर परिसरातील दिनेश विवेक घाग याला वर्तकनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच पिडीत मुलीचा व फिर्यादीचा जबाब नोंदवून कारवाई पूर्ण केली. शिवाय सबळ पुराव्यानिशी त्याच्याविरोधात 24 तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी जलदगतीने या प्रकरणी कारवाई केली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडित मुलगी ही रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास क्लासवरून घरी एकटीच चालत येत होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्या मुलीचा एमआरआर हॉस्पीटल ते शास्त्रीनगर असा कारने पाठलाग केला. तसेच गाडीमध्ये येण्याचा इशारा केला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. हा प्रकार पिडीत मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?

त्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी तपासाली गती दिली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासण्यात आले. त्यानंतर गुन्ह्यातील गाडीचा शोध घेतला गेला. तसेच त्या गाडीचा नंबर ही मिळवला गेला. त्यानंतर आरोपी हा ठाण्यातील किसन नगर, नं ३ या भागात राहत असल्याचे समजले. त्या भागात पोलिसांनी त्याचा शोध घेतला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित

परंतु तो बाहेर असल्याचे समजताच त्याचा मोबाईल नंबर पोलिसांनी मिळवला. त्यानंतर तांत्रीक पध्दतीने त्याचा शोध घेण्यात आला. पुढे तो कल्याण खडकपाडा येथील एका बारमधुन पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी आरोपी दिनेश घाग याला अटक केली. ही कारवाई वागळे परिमंडळ 5 चे उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त (वर्तकनगर विभाग) मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीपकुमार वेडे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल चिंतामण, पोलिस हवालदार जाधव, राठोड, झेमने, कांडेलकर, पोलिस नाईक पाटोळे, पोलिस शिपाई सौदागरे, नागरे कात्राबाद यांनी केले.

Advertisement