छत्रपती संभाजीनगरमध्ये 2021 साली झालेल्या एका ऑनर किलिंग प्रकरणी आई-मुलाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुलीनं प्रेमविवाह केल्याने आईने मुलाच्या मदतीने पोटच्या लेकीची हत्या केली होती. 5 डिसेंबर 2021 रोजी ही घटना उघड झाली होती. त्या प्रकरणात संभाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं हा निकाल दिला आहे.
काय होते प्रकरण?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत किशोरी उर्फ कीर्ति मोटेनं संजय थोरेशी प्रेमविवाह केला होता. कीर्तिच्या कुटुंबातील सदस्यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे सासरी राहत असलेल्या कीर्तिच्या घरी जाऊन तिची आई शोभा मेटे आणि भाऊ संकेट मोटे यांनी तिची हत्या केली.
( नक्की वाचा : शारीरिक सुखाच्या खेळात बॉयफ्रेंडनं दाबला गर्लफ्रेंडचा गळा... त्यानंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का )
कीर्तिच्या आई शोभाने मुलीचे पाय धरले तर भावानं कोयत्यानं बहिणीचा गळा चिरला. धक्कादायक बाब म्हणजे संकेत कीर्तिला जिवंत मारुन तिचे मुंडके धडावेगळे करुन ओट्यावर घेवून आला. खिशातला मोबाईल काढुन संकेत मोटेनं मुंडक्यासह सेल्फी घेतली. ते मुंडके ओटयावर टाकून दिले. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. सैराट चित्रपटाच्या पुनरावृत्तीने आदरलं होतं. या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने मुलीची हत्या करणाऱ्या आई आणि मुलाला जन्म ठेवीची शिक्षा सुनावली आहे.