जाहिरात
Story ProgressBack

शारीरिक सुखाच्या खेळात बॉयफ्रेंडनं दाबला गर्लफ्रेंडचा गळा... त्यानंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का

शारीरिक संबंध ठेवताना केलेला खेळ 'या' जोडप्याच्या जीवावर बेतलाय.

Read Time: 2 mins
शारीरिक सुखाच्या खेळात बॉयफ्रेंडनं दाबला गर्लफ्रेंडचा गळा... त्यानंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा अखेर खुलासा झाला आहे.
लंडन:

सिनेमा, सोशल मीडिया तसंच काही व्हिडिओ गेम याच्या नादात अनेक जण वास्तव विसरत जात आहेत. थिएटर, टीव्ही, मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारं जग हे आभासी आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. त्या घटनांचा व्हिडिओंचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव वाढतो. त्यामध्ये दाखवले जाणारे प्रकार प्रत्यक्ष आयुष्यात करण्याचा चांगलाच अंगलट येतो. ब्रिटनमधील एका जोडप्याच्या बाबतीतही हेच घडलंय. तब्बल दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा अखेर खुलासा झाला आहे. 

ब्रिटनच्या एका कपलला 'सेक्स गेम' खेळणं खूप महाग पडलंय. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय. 26 वर्षांच्या जॉर्जिया ब्रुक (Georgia Brooke) आणि 31 वर्षांचा ल्यूक कॅनन  (Luke Cannon) रिलेशनशिपमध्ये होते. शारीरिक संबंध ठेवताना केलेला खेळ त्यांच्या जीवावर बेतला. ल्यूकनं रोमान्सच्या दरम्यान जॉर्जियाचा गळा दाबला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. प्रेयसीच्या मृत्यूचा ल्यूकला मोठा धक्का बसला. ल्यूकनं आत्महत्या केली. ही 2 वर्ष जुनी घटना आहे. पण, त्यांच्या मृत्यूचं कारण आता समोर आलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'त्या' दिवशी नेमकं काय झालं?

या जोडप्यानं कोकेन आणि जीएचबीचं सेवन केलं होतं, ही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आलीय. ब्रुकनं पाठवलेले टेक्स्ट मेसेज देखील पोलिसांना मिळाले आहेत. त्यामध्येही 'या' खेळाचा उल्लेख होता. हे दोघं या प्रकारचा खेळ खेळत असत. त्या खेळाला ब्रुकची देखील परवानगी होती. 

गळा दाबल्यानं ब्रुकची तब्येत खराब झाली. त्यामुळे ल्यूक घाबरला. त्यानं आप्तकालीन सेवेसाठी फोन लावला. ब्रुकला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं हार्ट अटॅकनं तिचा मृत्यू झाला. ब्रुकच्या मृत्यूनंतर लगेच ल्यूक गायब झाला होता. यॉर्कशायर पोलिसांनी ल्यूकचा शोध सुरु केला. त्यावेळी त्यांना त्याचा मृतदेह हॉस्पिटलजवळच्या जंगलात लटकलेला सापडला. 

( नक्की वाचा : खोटं किडनॅपिंगचं शूट सुरु असताना पोहोचले खरे पोलीस, घडवली जन्माची अद्दल )
 

ब्रिटनमधील न्यायालयानं या घटनेचं वर्णन 'अनलॉफूल किलिंग' असं केलंय. ल्यूकला ब्रुकला मारायचं होतं याचा कोणताही पुरावा नाही. 'जास्त बळाचा वापर केल्यानं तिचा मृत्यू झालाय अशी माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देण्यात आलीय. जबरदस्तीनं आणि दीर्घकाळ गळा दाबल्यानं ब्रुकचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. 

ल्यूक आपल्या मुलीला नियंत्रणात ठेवत असे. तसंच तिच्यावर जबरदस्ती करत असे, असा आरोप ब्रुकच्या आईनं सुनावणी दरम्यान केला आहे. या दोघांनी 2021 साली सुरु केलं. त्यानंतर ल्यूकचं वागणं बदललं असा आरोप ब्रुकच्या आईनं केलंय. तर ल्यूकच्या भावानं त्याचं वर्णन एक उदार व्यक्ती असं केलंय.  तो लोकांना मदत करत असे, तसंच प्रेयसीचं चांगली काळजी घेत होता, असं त्याच्या भावानं म्हंटलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'
शारीरिक सुखाच्या खेळात बॉयफ्रेंडनं दाबला गर्लफ्रेंडचा गळा... त्यानंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का
Theft at Judge's house in Chandrapur, jewelry along with foreign currency stolen
Next Article
न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले
;