Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके

महिला शिकली, ती स्वावलंबी झाली तरीही तिच्यावर अद्यापही अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं कित्येक उदाहरणातून समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर विवाहित महिलांचा हुंड्यासाठी छळ, सासरच्या मंडळींकडून होणारा मानसिक आणि शारिरीक त्रास या विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. महिला शिकली, ती स्वावलंबी झाली तरीही तिच्यावर अद्यापही अनन्वित अत्याचार केले जात असल्याचं कित्येक उदाहरणातून समोर येत आहे. महिला लग्नानंतर सासरी जाते आणि आपलं सर्वस्व अर्पण करते. नवऱ्याचं घर स्वत:चं मानून ते सजवते, तिथल्या लोकांना आपलंस करते. मात्र प्रत्यक्षात कित्येक महिलांना या प्रेमाच्या बदल्यात केवळ छळ आणि दु:खच मिळत असल्याचं समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवी हगवणेचं प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा विवाहित महिलेवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे.  छत्रपती संभाजीनगरमधून हा प्रकार समोर आला आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप

माहेराहून पैसे घेऊन ये असं म्हणत ३० वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. एव्हे तर तर महिलेला दोरीने बांधून शोल्डरचे चटके देण्यात आल्याचा भीषण प्रकारही समोर आला आहे. सासरच्या लोकांकडून झालेल्या निर्दयी मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील चौका वाडी येथे घडली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस स्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजीम अब्दुल शेख रा. चौका वाडी तालुका फुलंब्री, नणंद शबाना निसार शेख, रिजवाना इम्रान शेख अशी आरोपींची नावं असून यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement