Crime News: गाडी अडवली, काच फोडली अन्... आमदाराच्या पुतण्यासोबत भयंकर घडलं! संभाजीनगरमध्ये खळबळ

शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंडवर काढल्याची चर्चा सुरू आहे. आमदार नारायण कुचे यांचे भाऊ देवीदास कुचे यांचा मुलगा उज्ज्वल याच्यासोबत हा प्रकार घडला.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना वाढत आहेत. क्षुल्लक कारणावरुन मारामारी, हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावगुंडांनी चाकूचा धाक दाखवत चक्क आमदाराच्या पुतण्यालाच लुटल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात चक्क एका सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यालाच गावगुंड्यांनी चाकूचे धाक दाखवत लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंडवर काढल्याची चर्चा सुरू आहे. आमदार नारायण कुचे यांचे भाऊ देवीदास कुचे यांचा मुलगा उज्ज्वल याच्यासोबत हा प्रकार घडला.

पक्षप्रवेशासोबत बंदुकीचे लायसन्स फ्री! बीडमध्ये 355 जणांकडे बंदुका; राजकीय पुढाऱ्यांकडून खैरात

उज्वल हा १८ ऑगस्ट रोजी रात्री अंबिकानगरमधून लक्ष्मीदेवी कारमधून बालाजी मंदिराजवळून घरी जात असताना एकाने त्याची गाडी अडवली. दगड टाकून कारची मागील काच फोडली. उज्ज्वलने कारमधून उतरून त्याला याबाबत विचारणा करताच आरोपीने चाकूचा धाक दाखवत खिशातून १ हजार रुपये  लुटत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान,छत्रपती संभाजीनगर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी आता कडक पाऊलं उचलायला सुरवात केली. काही दिवसांपूर्वी तेजा या गुंडांची धिंड काढणाऱ्या संभाजीनगर शहर पोलिसांनी आता आणखी एका आरोपीची धिंड काढली आहे. हर्षल मुळे म्हणतात मला अशी दादागिरी करत चाकूहल्ला करणारा सराईत गुन्हेगार हर्षल मुळे याची सिडको पोलिसांच्या पथकाने धिंड काढत माज उतरवला. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने हर्षलने चाकूहल्ला करत दोघांना जखमी केले होते. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Advertisement

नक्की वाचा- Pune News: पती पत्नी और वो! नवऱ्याच्या प्रेयसीला पत्नीने पकडलं, भर रस्त्यात अपहरणाचा थरार