Crime News: प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी डेंजर प्लॅन, पोलिसही हादरले, शहरात खळबळ

जवाहरनगर पोलिसांनी यात तपास करत समर्थ विनोद काळे, पवन परमेश्वर चौधरी, सोहेल शैकद बेग या त्रिकुटाला अटक करत सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  प्रेमात बुडालेले तरुण- तरुणी आपल्या प्रियकर- प्रेयसीसाठी काहीही करायला तयार असतात. अनेकदा प्रेमासाठी काही तरुण गुन्हेगारी जगताकडेही वळतात. असाच धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेयसीच्या खर्चासाठी तरुणाने चक्क चोरी केल्याचं उघडकीस आले आहे. 

गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्याची सवय...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेयसीवर खर्च करण्यास पैसे नसल्याने एका बीएच्या विद्यार्थ्याने पाच महिन्यात 14 दुचाकी चोरल्याचं उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांच्याकडून सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत. समर्थ विनोद काळे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

Amravati News: पोलीस भरतीच्या सरावात खोळंबा; अमरावती ग्रामीण पोलिसांचा मोठा निर्णय

प्रेयसीवरील खर्चासाठी नशेच्या आहारी गेलेल्या बी.ए. च्या विद्यार्थ्याने गुन्हेगारांसोबत मैत्री करून आधी पाच महिन्यांत विविध ठिकाणांवरून दुचाकी चोरीचे धडे घेतले. त्यानंतर १४ दुचाकी चोरून त्यांनी प्रेयसी व नशापाणीवर पैसे उडवले. जवाहरनगर पोलिसांनी यात तपास करत समर्थ विनोद काळे, पवन परमेश्वर चौधरी, सोहेल शैकद बेग या त्रिकुटाला अटक करत सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहे. 

तरुणाने चोरल्या 14 बाईक...

चौकशीत पवन, समर्थने चोरलेल्या दुचाकी ते सोहेलला विक्री करत असल्याची कबुली दिली. सोहेल १५ ते २५ हजारांत दुचाकी घेत पुढे ६० हजारांपर्यंत विक्री करायचा. विशेष म्हणजे, आरटीओतून दुचाकीचे कागदपत्रांच्या झेरॉक्सही मिळवायचा.  तरुणांच्या या प्रतापाने पोलिसही हादरुन गेले असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> यालाच म्हणतात खरी मैत्री! स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय