छत्रपती संभाजीनगर येथे एका जमिनीच्या व्यवहारात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी 41 लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. महसूल सहाय्यकाच्या मदतीने हा सर्व कारभार सुरू होता, असंही यावेळी समोर आलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबनाचे आदेश जारी केले. खिरोळकर यांना निलंबन काळात जालना जिल्हाधिकारी कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे. २७ मे रोजी एसीबीने खिरोळकर व महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. खिरोळकरच्या घरी टाकलेल्या छाप्यावेळी मोठं गबाड सापडलं होते.
नक्की वाचा - Pune News : पहाटे 4.30 वा. घराचं दार उघडलं, पुढच्या 12 मिनिटात...; हिंजवडीतील IT इंजिनियर तरुणीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलं होतं. २७ मे रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. शेतजमिनीच्या नावाखाली उपजिल्हाधिकाऱ्याने ४१ लाखांची मागणी केली होती. अखेर या प्रकरणात तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने प्लान करीत उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं. दरम्यान त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या घरातून तब्बल ५० लाखांचं सोनं सापडलं होतं. याशिवाय त्यांच्या घरातून १३ लाखांची कॅश सापडली होती. 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सापडले. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी मिळूव 67,45,308 किमतीच्या वस्तू सापडल्या आहेत.