Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. प्रेमामध्ये जीवाचीही पर्वा केली जात नाही. आयुष्य उधळून लावणाऱ्या अनेक घटना, किस्से आपण इतिहासात वाचले असतील. या आधुनिक युगात मात्र प्रेमासाठी घरच उधळून लावणाऱ्या प्रेयसीचा प्रताप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या प्रेयसीने प्रियकराच्या प्रेमाखातच घरातच हात (Girlfriend steals from her own house) मारला. प्रियकराला कर्जातून बाहेर काढायचंय मग आपल्याला काहीतरी करायला हवं. मग काय घरात जे काही मौल्यवान तिला दिसलं त्यावर हात साफ करीत तिने कुटुंबाला कंगाल केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरात एका प्रेयसीने प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी आपल्या आईचे दागिने चोरून दिल्याचं समोर आलं आहे. तरुणीनं चक्क आपल्या आईचे 11 तोळे दागिने आणि एक लाख 55 हजारची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली.
नक्की वाचा - उच्चशिक्षित तरुणीचा कारनामा; बहिणीच्या घरी दीड कोटींचा दरोडा, चोरीचं कारण ऐकून थक्क व्हाल
परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केलं आहे. ही घटना शहतील भारतनगर, एन-13, हडको भागात घडली. मंगेश विलास पंडित आणि 19 वर्षीय तरुणी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तर मंगेशसह त्याचा मित्र कुणाल केरकर याला बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे.